इंदापूर तालुका...... प्रतिनिधी
एस. बी. तांबोळी, मोबाईल 8378081147
- जय पराजय हा फक्त निवडणूकी पुरतेच मर्यादित असले पाहिजे. निकालानंतर मात्र सत्ताधाऱी व विरोधकांनी एकमेकाचे सहकार्य घेत गावाचा सर्वांगीण विकास करावा असे प्रतिपादन निरा भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी केले.
शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथे बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अशोक घोगरे, मनोज पाटील, जयवंत सुर्यवंशी, मयुरसिंह पाटील, बापू शिंदे, उमेश घोगरे, उमेश बागल, बाळासाहेब घोगरे, नामदेव घोगरे, तुकाराम घोगरे, सिध्देश्वर तावरे आदि मान्यवर उपस्थित होते.
बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनलमधून विजयी झालेले सरपंच सौ. पल्लवी गिरमे, सदस्य विठ्ठल घोगरे, सुधाकर कांबळे, सुप्रिया कांबळे, मंगल माने, अमृता शिंदे, तानाजी गायकवाड, कोमल घोगरे, तेजश्री पाटील, संतोष सुर्यवंशी, संतोष गायकवाड, रणजीत घोगरे, आनंदीबाई कांबळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
उदयसिंह पाटील पुढे म्हणाले, निवडणूका येतील जातील पण राजकारण संयमाने केले पाहिजे. एक नंबर वार्डात बाह्य आक्रमण झाले त्यामुळे मतदारांनी मतदान वाढवून त्याला प्रतिउत्तर दिले आहे. तर सहा नंबर वार्डात वेगवेगळ्या चर्चा ऐकावयास मिळायच्या परंतू व्यक्तिगत संबंधांमुळे उमेदवार विजयी झाले आहेत.
अशोक घोगरे बोलताना म्हणाले, दोन मामांच्या साथीने एक कार्यकर्ता एवढा हवेत गेला की जुन्या जेष्ठ कार्यकर्त्यांनांही कसलीच किंमत देत नव्हता. मामा कसे असतात माहिती आहेत ना कंसमामाची भुमिका यांनी निभावली आहे. मी उभा असतो तर विरोधात निवडणूक लढवणे समाधानाचे वाटले असते. परंतू आमची मुल उभी राहिली त्यांचा पार बिमोड करायच्या उद्देशाने दोन मामांनी काम केले. या मामांनी व त्या मामांनी काय काम केले. शंकरराव भाऊ व घोलप साहेब नंतर बॅकेत व सहकारी संस्थेत एक तरी माणूस लावला का? हर्षवर्धन पाटलांनी सहकारी संस्था व कारखाना उभा करून हजारो माणसे कामाला लावली. पॅनलचे नेतृत्व करणारे माझ्या संस्थेत कामाला आहे. परंतु तो भान विसरला त्याला वाटले आपण फार मोठे झालो आहोत. तालुक्याने आमच्या वार्डावर अतिक्रमण करून माझा मुलगा विजयी होवून या सर्वांचा बाप झाला आहे. वाघावो २०२४ ला तुम्ही पुढेच येणारच आहे. तेव्हा तुमची अवस्था काय करतो ते बघतच राहा. इकडं तिकडं करणाऱ्यांनो काय तुमची कामे आहेत, आमचे तोंड उघडायला लावू नका तोंड उघडलं तर जनता माफ करणार नाही. मी गप्प बसणार नाही अख्खा तालुका पिंजून काढून यांची अंडी पिल्ली बाहेर काढण्याचा इशारा शेवटी दिला.
कार्यक्रमात नुतन सरपंच सौ पल्लवी गिरमे यांनी मतदाराचे आभार मानले. सूत्रसंचालन कालीदास आव्हाड यांनी केले. प्रास्ताविक नंदकुमार शिंदे सर स्वागत श्रेयस बागल यांनी तर आभार प्रसाद गायकवाड यांनी मानले.
फोटो - शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथे सत्कार प्रसंगी बोलताना उदयसिंह पाटील.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा