**विशेष प्रतिनिधी--- राजू (कासिम) मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी**
भारत सरकार, महाराष्ट्र शासन व विमा कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने, अर्थसहाय्यीत, अनुदानित प्रधानमंत्री रब्बी पीक विमा योजना २०२३ स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सवात महाराष्ट्रात राबविली जात आहे. माळशिरस तालुक्यात जिरायत ,बागायत ज्वारी ,बागायत -गव्हू , हरभरा ,कांदा पीकासाठी अधिघोषीत क्षेत्रासाठी म्हणजे महसुल व तालुका वरील अधिघोषीत पीकासाठी फक्त १ रु प्रति हेक्टर वर लागू करण्यात आली आहे. "पिक विमा *पात्र*लाभार्थी" - कर्जदार , बीगर कर्जदार व भाडेपट्ट्यावर शेती करत असलेले सर्व शेतकरी या साठी पात्र आहेत . कर्जदार शेतकरी यांना विमा मध्ये भाग घ्यावयाचा नसेल तर अंतीम मुदत पूर्व ७ दिवस घोषणापत्र बॅकेला देणे बधनकारक आहे बीगर कर्जदार लामार्थी ना ऐच्छीक स्वरुपाचा आहे . विहीत नमुन्यातील विमा प्रस्ताव पूर्णतः भरुण आधारकार्ड, बॅक पास बुक ' घोषणापत्र व १रु प्रति हे प्रति पिक विमा हप्ता खाते असणाऱ्या बॅक किंवा वि . का सह सोसायटी अथवा सी.ए.सी सेंटर अथवा ऑनलाईन अंतीम मुदत पर्यंत भरून सहभाग घ्यावयाचा आहे. विमा अंतीम मुदतः - ज्वारी बागायत व जिरायत साठी -३० नोव्हेबर , बागायत गव्हू हरभरा व कांदा पीकासाठी १५ डिसेंबर अंतीम मुदत आहे . आधिक माहीतीसाठी संपर्कः- - पीक विमा अधिक महितीसाठी नजीकचे कृषि विभाग कार्यालय, संबंधीत गावचे कृषि सहाय्यक , टोल फ्री क्रमांक -18004195004, कृषि विभाग संकेत स्थळ -www.maharashtra.gov.in पिक विमा संकेत स्थळ -www.pmfmy.gov.in महिती सहकार्य मदत उपलब्ध आहे. "पीक विमा " "नुकसान भरपाई "नैसार्गिक आपत्ती पासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर अधिसुचीत घोषीत पिकासाठी विमा संरक्षण , नुकसान राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उबरठा उत्पनापेक्षा कमी नोंदवले गेल्यास नुकसान भरपाई देय राहील . "विमा संरक्षण बाबी " खालील बाबीस विमा संरक्षण राहील १- प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत घोषीत पिकाची पेरणी, लागवड व उगवन न झालेस . २ पिकाच्या हंगामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान ३- पीक पेरणी ते काढणी पर्यत कालावधीत क्षेत्र पातळीवर आग, वीज, गारपीठ, वादळ , चक्रीवादळ पुर, क्षेत्र जलमय , भूस्खलन ' दुष्काळ ' पावसातील खंड, किड व रोगामुळे उत्पनातीलील येणारी घट . ४- स्थानिक नैसार्गिक अपत्तीमुळे होणारे पीकाचे नुकसान वरील प्रतिकुल हवामानामुळे अपाती आलेमुळे अधिसुचीत पीकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते. ५ - काढणी पश्चात नुकसान अधिसुचित पिकाचे काढणीनंतर २ आठवडे (१४ दिवस )च्या आत गारपीठ , चक्रीवादळ , पाऊस, बिगर मोसमी पाऊस मुळे नुकसान झाले तर ७२ तासाचे आत विमा कंपनी टोलफ्री क्रमांक अथवा कृषि विभाग देणे आवश्यक आहे त्यावर आधारित पंचनामे करून नुकसान निश्चित केले जाते . केंद्रशासन व राज्यशासनाने विमा संरक्षण बाबीची व्याप्ती वाढवून लवचीक घोरण च्या आधारे राज्यभर पीक विमा बीड पॅटर्ण राबवित आहे. १रु प्रति हेक्टर वजा जाता राहीला हाप्ता केंद्र व राज्य शासन भरत आहे. माळशिरस तालुका मध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस व दृष्काळ तालुका म्हणून घोषीत केला आहे व सतत बदलणारे हवामान इत्यादीवर मात करण्यासाठी शेतकरी बाधवाना विमा भर ही काळाची गरज आहे असे अहवान मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यालयाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा