इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: - बावडा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या सौ. पल्लवी रणजीत गिरमे यांनी १५२४ चे मताधिक्य घेत सरपंचपद पटकावले. तर १७ जागेपैकी काळेश्वर ग्रामविकास पॅनल १२ जागेवर तर पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार पाच जागेवर विजयी झाले. तसेच सौ तेजश्री पाटील यांनी ७७२, सुधाकर कांबळे ५६२, विठ्ठल घोगरे ४८४ चे मताधिक्य घेवून सहाही वार्डात सर्वाधिक मतांनी विजयी झाले. नोटाला सर्व वार्डात मिळून ५५९ मते पडली.
बावडा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सहा वार्डातील १७ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित काळेश्वर ग्रामविकास पॅनल व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली पंडितराव पाटील, माजी सभापती प्रशांतराव पाटील, महादेवराव घाडगे, सुरेश शिंदे सर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पद्मावती ग्रामविकास परीवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत झाली. तर अपक्षांच्या प्रभावामुळे अनेकांचा हातातोंडाशी आलेला घास निसटल्याने पराभव पत्करावा लागला.
सरपंच पदासाठी अपक्ष लक्ष्मी लहू कुर्डे (३६८), राष्ट्रवादी काँग्रेसच्या फरझाना साजिद मुलाणी (२८६५), तर भाजपाच्या सौ. पल्लवी रणजीत गिरमे (४३८९) यांनी मते घेत १५२४ ची आघाडी घेवून विजय संपादन केला. तर नोटाला १४१ मते पडली आहेत.
ग्रामपंचायतच्या वार्ड एक (सर्वसाधारण) आण्णा सुनिल कांबळे(२४), सगाजी मोहन कांबळे(४४), सागर बाळासो खंडागळे(५४), विठ्ठल शिवाजी घोगरे(८४१), लखन शंकर जगताप (६७), बाळासाहेब ज्ञानदेव तावरे(३५७) तर नोटाला(१४) मते पडली. विठ्ठल घोगरे ४८४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
वार्ड एक नागरिकांचा मागास प्रवर्ग सुधाकर दत्तात्रय कांबळे(९५९), दत्तात्रय भिकू कुंभार (३९७), नोटाला (४७) मते पडली. सुधाकर कांबळे ५६२ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
वार्ड एक मागासवर्गीय स्त्री ज्योत्स्ना बाबासाहेब कांबळे(३७५), दिपाली सगाजी कांबळे(४१), सुप्रिया अखिल कांबळे(८०९), ज्योती धनाजी खंडागळे(१३९), तर नोटा (४०) मते पडली. सुप्रिया कांबळे ४३४ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.
वार्ड दोन सर्वसाधारण महादेव यादवराव घाडगे(६३०), किसन संभाजी माने(५८१), संजय राजाराम मोरे(२७) तर नोटाला(१५) पडली. महादेवराव घाडगे ४९ विजयी झाले. मंगल राजेंद्र होनमाने(७१७), राणी राजेंद्र होनमाने(५००) तर नोटा(३६) पडली. मंगल माने २१७ विजयी झाले. कल्पना वसंत यादव(४१६), अमृता बळीराम शिंदे(८०५) तर नोटाला(३२) मते पडली. अमृता शिंदे ३८९ मतांची आघाडी घेत विजयी झाले.
वार्ड तीन तानाजी ज्ञानदेव गायकवाड (५५४), प्रकाश भगवान गायकवाड(३१६) तर नोटाला(१४) मते पडली. तानाजी गायकवाड २३८ मतांनी विजयी झाले. कोमल दीपक घोगरे (५३८), वर्षा उमेश पाटील(३३५) तर नोटाला(११) मते पडली. कोमल घोगरे २०३ मतांनी विजयी झाल्या.
वार्ड चार महादेव हनुमंत घोगरे(९०), विक्रमसिंह तुकाराम घोगरे(८२३), सुरेश गणपतराव घोगरे(४३८), लखन शंकर जगताप(१६), तर नोटाला(११) पडली. विक्रमसिंह घोगरे ३८५ मतांनी विजयी झाले. उषा सुभाष आवारे(६०४), कोमल मंगेश आवारे(८४), लपिता सुनील साबळे(६५२) तर नोटाला(३८) पडली. लपिता साबळे ४८ मतांनी विजयी झाल्या. मनिषा विनोदकुमार जाधव(७१०), सईदा रशिद सय्यद(६३०) तर नोटाला(३८) पडली. मनिषा जाधव ८० मतांची आघाडी घेत विजयी झाल्या.
वार्ड पाच लक्ष्मण महादेव गायकवाड (५४७), संतोष बापू गायकवाड(१०३९) तर नोटाला(२७) मते पडली. संतोष गायकवाड ४९२ मतांनी विजयी झाले. राकेश सुभाष कांबळे(२१), सगाजी मोहन कांबळे(२४), निलेश मोहन घोगरे(६४०), संतोष विलासराव सूर्यवंशी (८८४), दशरथ सदाशिव सोनवणे (१५) तर नोटाला(५) मते पडली. संतोष सूर्यवंशी २४४ मतांनी विजय झाले. प्रतीक्षा अविनाश धाइंजे(६०), प्रियंका संतोष पवार(३७१), तेजश्री उदयसिंह पाटील (११४३), रिजवाना युसुफ शेख(२९) तर नोटाला(१०) मते पडली. तेजश्री पाटील ७७२ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या.
वार्ड सहा राकेश सुभाष कांबळे(२४), सतीश शरद कांबळे(९१), रणजीत अशोक घोगरे(५४१), विक्रांत निवृत्ती घोगरे(४३५), दशरथ सदाशिव सोनवणे(११५) तर नोटाला(२५) मते पडली. रणजीत घोगरे १०६ मतांनी विजय झाले. अश्विनी पांडुरंग कांबळे (६४४), आनंदीबाई जालिंदर कांबळे(६१५), जनप्रिया राकेश कांबळे(३८), मैनाबाई बनाजी कांबळे(३८), शोभा अनिल कांबळे (४५१), सारिका शितलचंद्र कांबळे (५६०), आम्रपाली उमाकांत तोरणे(६१) तर नोटाला(५५) मते पडली. अश्विनी कांबळे १९३ व आनंदीबाई कांबळे ५५ मतांची आघाडी घेत विजयी झाल्या.
मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आल्यामुळे या निवडणुकीत अपक्षांचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसून आला. परंतु ही निवडणूक सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. परंपरागत विरोधक सत्ताधाऱ्याबरोबर तर स्वकीयच बंड करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभा ठाकल्याचे चित्र पहावयास मिळाले. प्रचाराच्या गाड्या लावण्यात आल्या नाहीत. मोठ्या जाहीर सभा घेण्यात आल्या नाहीत. गुपचूप प्रचार यंत्रणा राबवण्यात आल्यामुळे विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांची धाकधूक शेवटपर्यंत वाढलेली होती. पैशाचा वारे माप वापर झाल्याची चर्चा व कुजबुज ऐकावयास मिळाली. तर ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांची नागरिकां बरोबर बेशिस्त वर्तनाबद्दलची तक्रार अनेक मतदारांनी प्रचार यंत्रणेतील उमेदवार व कार्यकर्त्याजवळ बोलून दाखवल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. याबाबत सत्ताधारी पक्ष कोणता निर्णय घेणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा