Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ५ मे, २०२५

*गणेशगांव येथे पाटबंधारे खात्याच्या विरोधात युवा सेनेचे बंधाऱ्यावर मुंडण करून निषेध आंदोलन.*

 




उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्युज मराठी

माळशिरस तालुक्यातील निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा गेली अनेक वर्ष झाले वाहून गेला होता तो बंधारा पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त न केल्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडण आंदोलन करण्यात आले.

           गेली अनेक वर्ष झाले निरा नदीवरील गणेशगांव येथील बंधारा पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला होता.त्याच वेळी युवा सेनेच्या वतीने याच बंधाऱ्या वरती जल समाधी आंदोलन, जनांक्रोश आंदोलन,हलगी नाद आंदोलन केली होती त्यावेळी तो बंधारा तात्काळ दुरुस्त करून देतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु तो बंधारा आजतागायत दुरुस्त केला नाही.गणेशगांव हा बंधारा माळशिरस आणी इंदापूर तालुक्याला जोडलेला असून या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे व व्यापारी वर्गाचे दळणवळण जास्त प्रमाणात आहे.याही पेक्ष्या तेथील शाळकरी मुलांना गेली अनेक वर्ष झाले नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.हे लक्षात घेता तेथील बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी शिवसेना युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व गणेशगांव मधील ग्रामस्थांच्या वतीने गणेशगांव बंधाऱ्यावरती मुंडनं आंदोलन करून पाटबंधारे मंत्री व पाटबंधारे अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.      

       यावेळी शिवसेना विधानसभा तालुका प्रमुख महादेव बंडगर,युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता भाऊ साळुंखे,महादेव लोखंडे,विठ्ठल नलवडे,गणेश यादव,सिताराम शेंडगे,माऊली मदने,नजीरभैय शेख,विजय यादव,बापु गोखले, माऊली क्षिरसागर,पोपट रुपनवर,नाना क्षिरसागर, भाईसाहेब शेख,अमीर कोरबु,लिंबाजी शिंदे,सुनील चव्हाण,मनोहर यादव,प्रशांत पराडे,गणेश काळे,लालासाहेब भोई,ओम पराडे,बन्सीलाल भोई, विकास भोई,संकेत इंगळे, अनिकेत पराडे,बापू भोई,अमित भोई आदी उपस्थित होते.


*चौकट*


गणेशगांव येथील बंधाऱ्याचे काम जर आठ दिवसात नाही चालू झाले तर या पुढील आंदोलन हे पंढरपूर येथील पाटबंधारे कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल इशारा युवा सेनेच्या व शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.गणेश इंगळे 

युवा सेना जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा