उपसंपादक.... नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील शेंडेचिंच येथील तीन युवकांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी आजपासून त्यांनी आमरण उपोषण चालू केले आहे.
माळशिरस तहसीलदार यांना महादेव कोंडीबा काळे, शेखर विष्णु ढेंबरे, निखिल देविदास घाडगे यांनी पत्र देऊन आज पासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवणार आहेत.
शिवाजी चौक (बांदलवाडी) शेंडेचिच येथे उपोषणाला बसले आहेत.त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी १ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण चालूच रहाणार आहे.याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनाची प्रत वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र पिलीव व ग्रामपंचायत शेंडेचिंच यांना दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा