उपसंपादक.... नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
गणेशगांव ग्रामपंचायतीचे उपविभागीय अधिकारी यांना पत्र.
गणेशगांव ग्रामपंचायतीच्या वतीने अकलूजचे उपविभागीय अधिकारी यांना ग्रामपंचायतीने पत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे तो पर्यंत गावामध्ये सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे.तसेच जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात ग्रामसभा ही घेण्यात येऊ नये असे मराठा समाज बांधवानी सांगताच ग्रामसभा न घेण्याचे गणेशगवचे सरपंच श्री पोपट रुपनवर यांनी त्वरित मान्य केले .व ग्रामसभा रद्द केली .
.माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांवमधील ग्रामस्थ व सकल मराठा समाज मौजे गणेशगांवच्या निवेदनात जोपर्यंत मराठा समाजाला शासनाकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर मिळत नाही व सरसकट मराठा समाजाला कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना मौजे गणेशगांवात येण्यास बंदी करण्यात येत आहे असे म्हटले आहे.हे निवेदन गणेशगांव ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा