संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात ९० टक्के तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले आहेत परंतु तुळजापूर तालुका हा कुसळी गवताचा व डोंगराळ भाग असून अत्यंत पाऊस कमी झाला आहे. तालुक्यामध्ये सध्य परिस्थितीमध्ये काही गावांमध्ये टँकर चालू आहेत सर्वसामान्य शेतकरी मजूर, कामगार यांचा रोजी रोटीचा अत्यंत बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.
सदरील तुळजापूर तालुका हा संपूर्ण पावसावर अवलंबून असून यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळ परिस्थिती असून सुद्धा केंद्र सरकारच्या जाचक अटीमध्ये न बसल्यामुळे राज्य सरकारने तुळजापूर तालुका दुष्काळ यादीतून वगळ आहे तरी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांना मदत तसेच सोयाबीन दूध या पिकासह सर्व पिकांचे हमीभाव केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे तसेच सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना मिळावी घरगुती वापरातील गॅस डिझेल व पेट्रोलच्या वाड्याला किमती कमी कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी तर्फे आंदोलन छेडण्यात येईल याची सरकारने गंभीर दखल घ्यावी हे विद्यमान आमदार यांना माहिती असूनही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून एक प्रकारे तुळजापूर तालुक्यावर अन्याय केला असून महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करून तालुक्यातील तमाम जनतेला सहकार्य करावे.
याकरीता तालुक्यातील तमाम जनतेच्या व शेतकरी वर्गाच्या वतीने तुळजापूर तहसील कार्यालय समोर लक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले व यावेळी तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करून तालुक्यावर पडलेल्या बाया दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये शासनाच्या योजना राबवल्या पाहिजेत व पुनश्च दुष्काळग्रस्त यादीमध्ये तुळजापूर तालुका समाविष्ट करावा असे लेखी निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले. यावेळेस महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी धीरज भैया पाटील. ऋषिकेश मगर .अमोलजी कुतवळ. अशोक भाऊ मगर. श्याम पवार. सुनील जाधव. चेतन बंडगर राहुल खपले अजय साळुंखे .आकाश शिंदे. हरी कांबळे. काजी अत्तर .आनंद जगताप. अमोल जाधव. बाळासाहेब शिंदे. सुदर्शन वाघमारे .विकास भोसले. शरद जगदाळे .शहाजी कसबे. राजाराम जाधव .शशिकांत मुळे .हेमंत कांबळे. दयानंद राठोड. संदीप कदम .शेख तौफिक. संदीप गंगणे. रणजीत इंगळे .शहाजी नन्नवरे. रामेश्वर घोगरे .माणिक गरड .भरत जाधव .नितीन कदम .तुकाराम सपकाळ. विनायक पाटील .नवनाथ भरले .रामचंद्र ढवळे. श्रीकांत धुमाळ. प्रदीप कदम .युवराज साठे .विशाल साळुंखे. चेतन पांडागळे. नवनाथ जगताप .नशीब शेख .दीपक पाटील. बालाजी पांचाळ. इत्यादी तालुक्यातील तमाम शेतकरी वर्ग व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा