Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

फीनिक्स इंग्लिश स्कूलमधील बालगोपाळांना दीपावलीच्या शुभेच्छा कार्यक्रम संपन्न .


 उपसंपादक ......नूरजहाँ शेख

टाइम्स ४५ न्यूज मराठी

                    हिन्दू संस्कृतीमध्ये दिपावली सण मोठ्या आनंदाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यामध्ये घराबाहेर आकाशकंदील व दारात पणत्या लावून रात्रीचा प्रकाशमय उजेड केला जातो.त्याच बरोबर लहान मुलांना नवीन कपडे आणले जातात.लहान मुलांनी दिवाळीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करावा असे आवाहन फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या नूरजहाँ शेख यांनी केले.त्या दिवाळी सणाच्या सुट्टीनिमित्त शुभेच्छा कार्यक्रमात बोलत होत्या.

          घरी आई मुलांसाठी चकली,शेव,चिवडा,शंकरपाळ्या,करंजी,लाडू,फराळाचे केले जाते.त्याच बरोबर संध्याकाळी फटाक्याची आतषबाजी केली जाते त्यामध्ये भुई चक्कर, झाडे, फुलबाज्या,लवंगी फटाके वाजवून मुले दिवाळीच्या सणात मुले आनंद व्दिगुणित करत असतात.त्यामुळे मुलांनी दिवाळीचा सण साजरा करता काळजी घ्यावी व हवेत प्रदूषण होईल अशा फटाक्या उडवू नका असे सांगितले.यावेळी तांबवे येथील महादेव मोहन कोळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून दिपावलीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा