इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त अकराशे टाळकरी व दहा हजार भाविक भक्तांच्या उपस्थितीत सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यानिमित्त श्रीगुरू सोहम महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नीरा नरसिंहपूर येथे गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, कल्याण काळे, देहू - आळंदी व पंढरपूर संस्थानांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. तर पुणे, सोलापूर सह परीसरातून सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्तांसह दहा हजार जणांनी उपस्थिती लावली होती.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलताना म्हणाले, श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांची आतापर्यंत हजारो कीर्तने, प्रवचने संपूर्ण राज्यात झाली आहेत. त्यांच्या कीर्तनातील एक अध्याय जर बघितला तर पुढच्या दहा पिढ्या उभ्या करण्याची ताकद त्यांच्या मध्ये आहे.
माजी मंत्री व आमदार दत्तात्रय भरणे बोलताना म्हणाले, गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त सांगतो, लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. नरसिंहाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. देवस्थान विकास आराखड्यातील सर्वच कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील. आई व वडील यांची काळजी घेणे गरजेचे असून सेवा करण्यास कोणीही कमी पडू नये. जीवनामध्ये आई-वडील निघून जातात तेव्हाच त्यांची किंमत कळते म्हणून त्यांचा विसर पडू देऊ नका असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून ११०० टाळकऱ्यांनी काल्याच्या किर्तनास हजेरी लावली. तर दहा हजारहुन अधीक भाविक भक्त व ग्रामस्थ काल्याचे किर्तन व महाप्रसादासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्ताह कमिटीचे कार्याध्यक्ष हभप राम महाराज अभंग व महेश सुतार यांनी केले. काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली.
फोटो - १) गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या ६५ व्या अभिष्टचिंतना निमीत्त सन्मानित करण्यात आले.
२) काल्याच्या कीर्तनाची दहीहंडी फोडताना गुरुवर्य सोहम महाराज देहुकर
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा