इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- येथील तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत सुरू असलेल्या २६० कोटींच्या विविध विकास कामांची पाहणी माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
नीरा नरसिंहपूर ( ता.इंदापूर ) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत २६० कोटींची विकास कामे सुरू आहेत. त्याची पाहणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यां समवेत केली. यावेळी सरपंच सौ अर्चना नितीन सरवदे, सचिन सपकाळ, शुभम निंबाळकर, श्रीकांत बोडके, सुदर्शन बोडके, संतोष सुतार, सोमनाथ मोहिते, दशरथ राऊत, अरूण क्षिरसागर आदि उपस्थित होते.
तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बिडकर ओवरी, भक्त निवास, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, गावातंर्गत काॅक्रीटीकरण, नीरा व भिमा नदीवरील घाट व पुल, नीरा नदीवरील बंधारा, अद्यावत बसस्थानक, भुमीगत विद्युतीकरण आदि कामे पुर्णत्वास आली आहेत. त्याची पाहणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी करून सुचना केल्या.
फोटो - नीरा नरसिंहपूर येथील बिडकर ओवरीची पाहणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा