Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

"आधार कार्ड "फसवणुकीची चिंता सतावतेय ? आधार कार्ड बायोमेट्रिक लॉक करा आणि निश्चित रहा.

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                           आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि इतर ओळखपत्रांसाठी आधारचा वापर केला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून आधारकार्डमुळे होणाऱ्या फसवणूकीच्या घटना समोर येत आहे. अनेकदा आपण आपल्या आधारची बऱ्याच ठिकाणी देतो पण काही लोक त्याचा गैरवापर करतात. आधार कार्ड वापरून एखाद्याच्या नावावर कर्ज घेतल्याच्या घटना समोर आल्या आहे. आधार कार्ड वापरून पैसे उकळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बोटांचे ठसे म्हणजेच बायोमॅट्रिक्सचा वापरून करून अनेकदा फसवणूक होते त्यासाठी कोणत्या ओटीपीची देखील आवश्यकता नसते. त्यामुळे स्वत:ची अशी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी काही एक सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


आधार कार्डमुळे होणारी ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही बायामॅट्रिक्स लॉक करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या….


आधार कार्डचे बायमॅट्रिक्स कसे करावे लॉक? जाणून घ्या


१. सर्वात आधी गुगलवर MY Aadhar Search करा आणि https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळा भेट द्या.


२. लॉगईन क्लिक करा. त्यानंतर आधार नंबर टाका, स्क्रिनव दिसत असलेला कॅपचा कोड टाका आणि send ओटीपीव क्लिक करा.


३. आधारकार्डशी सलग्न केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो टाका


४. त्यानंतर लॉक बायोमॅट्रिक लॉक असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


५, तुमचे बायमेट्रिक लॉक करा.


६. जर बँकेच्या कामासाठी अथवा नवीन सीम कार्ड घेण्यासाठी तुम्हाला बायमॅट्रिक्स वापरायचे असेल तर तुम्ही ही पद्धत वापरून बायमॅट्रिक अनलॉक करू शकता. त्यांनतर १० मिनिटांत तुमचे बायमॅट्रिक पुन्हा लॉक होतील.


सौजन्य ;--

वार्ताहर--आवाज महाराष्ट्राचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा