SB Tamboli
इंदापूर तालुका प्रतिनिधी
- बावडा ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक काहीसा अनुचित प्रकार वगळता शांततेत पण चुरशीचे मतदानाने संपन्न झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहत मतदानात सहभाग नोंदवला. मतदाराचा उत्साह पाहता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
बावडा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकी करता जनतेतून सरपंच निवडी करिता तीन उमेदवार रिंगणात उतरले होते. तर सहा वार्डातील १७ जागेसाठी जवळपास ५६ जणांनी आपले नशीब आजमावले आहे. काळेश्वर ग्रामविकास पॅनल व पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलमध्येच मुख्यत्वे करून सरळ लढत पार पडली. तर त्यामध्ये काही अपक्षांनीही आपली उमेदवारी लावली होती.
बावडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये सहा वर्गातील मतदारांसाठी मतदान करण्याची सोय करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसत होते. तर अठरा वर्षावरील मुलापासून शंभरी पार केलेल्या वृद्धांपर्यंत सर्वांनीच हिरीरीने व चुरशीने मतदानात सहभाग नोंदवला.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देत निरपेक्ष मतदानासाठी मतदान केंद्रात भ्रमण दूरध्वनी नेण्यास मज्जाव करण्याचे आदेश दिले. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.
काळेश्वर ग्रामविकास पॅनलचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, अमरसिंह पाटील, मनोज पाटील, मयूरसिंह पाटील, विकास पाटील, किरण पाटील, बाळासाहेब घोगरे, नामदेव घोगरे, समीर मुलानी, मुनीर आतार, मुजमिर तांबोळी आदिंसह पॅनलमधिल उमेदवार व कार्यकर्त्याने मोठ्या जोमाने प्रचार राबवला होता. बावडा गावची जनता सुज्ञ असून अठरापगड जातीचे लोक गावामध्ये राहात आहेत. त्यामुळे नेतृत्व जरी आम्ही करीत असलो तरी सत्ता राबवण्याचे काम यांच्याच माध्यमातूनच होत आले असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
पद्मावती ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा अप्पासाहेब जगदाळे, प्रशांतराव पाटील, पंडितराव पाटील, महादेवराव घाडगे, सुरेश शिंदे सर, धैर्यशील पाटील, विजय गायकवाड, सुरेश घोगरे, संग्रामसिंह पाटील, निलेश घोगरे, विजय घोगरे, नागेश गायकवाड, नंदू गायकवाड आदिंसह उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचार जोमाने केला होता. बावडा गावातील नागरिकांनी परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकत मोठ्या प्रमाणात मतदान घडवून आणले आहे जर आमच्या ताब्यात ग्रामपंचायतचे सूत्रे दिली तर मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणणार असल्याचे प्रशांतराव पाटील, पंडितराव पाटील, सुरेश शिंदे सर यांनी सांगितले.
तर दोघांच्या भांडणात आमचाच फायदा होणार असून जनतेने आमच्या बाजूने कौल दिल्यास जनतेच्या मनाप्रमाणे वार्डाचा विकास घडवून आणू अशी प्रतिक्रिया अनेक अपक्षांनी बोलून दाखवली. त्यामध्ये राकेश कांबळे, धनाजी खंडागळे, सगाजी कांबळे आदि अपक्षांनी बोलून दाखवली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा