Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

स्पेसवेल इंटिरियर डिझाईन एल एल पी कंपनी पुणे,ही कंपनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित


 

अकलूज--- प्रतिनिधी

केदार लोहोकरे

टाइम्स 45 न्यूज मराठी

माळशिरस तालुक्यातील शेंडेवाडी ग्रामीण भागातील शेंडे कुटुंबातील रणजित शेंडे,मिलिंद शेंडे व ऐश्वर्या शेंडे यांच्या पुणे बाणेर येथील स्पेसवेल इंटेरियर डिझाईन एल.एल.पी.कंपनी या नामांकित इंटेरियर डिझाईन कंपनीला वर्ष-२०२५ चा आर्किटेक्चर इंटिरियर डिझाईन अवार्ड पुरस्कार बेंगलोर येथील हॉटेल ताज वेस्ट एंड या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात आले.     



                 बांधकाम व डिझाईन बाबतीमधील नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून इंटिरियर डिझाईन विभागात विशेष कामगिरी केली त्यासाठी संपूर्ण भारत देशातून कामाची गुणवत्ता आधारे अनुभवी तज्ञ यांच्या पॅनल प्रमुखांनी या कंपनीची निवड केली.अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व स्पर्धात्मक युगात या कंपनीने पुणे सारख्या मोठ्या शहरात व संपूर्ण महाराष्ट्रमध्ये दैदीप्याम कामगिरी केली.माळशिरस तालुक्यातील शेंडेवाडी सारख्या छोठ्याशा गावातून पुणे येथे जाऊन कंपनी स्थापन करून त्याचा विस्तार करणे व कमी दरात सेवा उपलब्ध करून देत असल्यामुळे या कंपनीचा ग्राहक वर्ग देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या कामगिरी बाबत सध्या सर्वच स्तरातून कंपनी स्टाफ व डायरेक्टर वर्ग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या सर्व कंपनी जडणघडणीमध्ये रणजित शेंडे,मिलींद शेंडे,ऐश्वर्या शेंडे यांचे परिश्रम व त्यांना संपुर्ण शेंडे कुटुंबाची साथ लाभली आहे. स्पेसवेल इंटेरियर डिझाईनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शेंडे कुटुंबीयावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होतआहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा