Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजच्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश* *जीसीसी, टीबीसी ,कॉम्प्युटर टायपिंग घेण्यात आलेल्या स्पीड परीक्षेत- अर्चना शिंदे द्वितीय तर तेजस्विनी थोरात आणि सुशांत वगरे तृतीय..!

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45 न्यूज मराठी

जीसीसी टीबीसी जून-जुलै 2025 परीक्षेत अर्चना शिंदे 96.50% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात द्वितीय, तेजस्विनी थोरात आणि सुशांत वगरे 95.50% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक बहुमान प्राप्त केला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जून जुलै 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग स्पीड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज या संस्थेतील अर्चना तुकाराम शिंदे हिने इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात 96.50% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला, तर तेजस्विनी सुहास थोरात हिने इंग्रजी 30 स्पीड या विषयात व सुशांत हरिदास वगरे याने मराठी 30 स्पिड या विषयात 95.5% गुण प्राप्त करत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला. भक्ती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची मागील परंपरा कायम ठेवत दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे.

विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-

इंग्रजी 30 श.प्र.मि. स्पीड या विषयात - अर्चना तुकाराम शिंदे 96.50% प्रथम, तेजस्विनी सुहास थोरात आणि सुशांत हरिदास वगरे 95.50% द्वितीय, वैष्णवी सुनील देसाई 94.50% तृतीय. 

मराठी 30 श.प्र.मि. या विषयात :- आकाश गंगाराम घुले 95% प्रथम, श्रीकांत सतीश साठे आणि अर्चना तुकाराम शिंदे 94.50% द्वितीय, राजू सुभाष तेली 92% तृतीय.

इंग्रजी 40 स्पीड या विषयात :- प्रेरणा निवृत्ती जाधव 90.50% प्रथम, श्रीराज नितीन भोसले 85% द्वितीय, वैष्णवी रविकांत नाळे आणि संजीवनी बाळासाहेब वाघमोडे यांनी 79% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

या परीक्षेतील मराठी 30 स्पीड विभागामध्ये राजू सुभाष तेली व काजल जोतीराम सावंत यांनी 40 पैकी 40 गुण प्राप्त केले तर लेटर स्टेटमेंट आणि ई-मेल या एकत्रित विभागांमध्ये विकास हरिदास जाधव, ऋतुजा आनंदराव महानवर, वैष्णवी राजेश कपुरिया, कावेरी बन्सी गायकवाड, अस्मिता जगदीश इंगळे, आकाश गंगाराम घुले, कोमल सतीश तोडकर, मच्छिंद्रनाथ प्रभाकर घाडगे, मोनाली राजेंद्र माने, प्रगती छगन पालवे यांनी 35 पैकी 35 गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य संपादन केले. संस्थेतील 72 विद्यार्थ्यांनी ए प्लस श्रेणी व 18 विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने शासकीय, निमशासकीय, महामंडळे, सहकार क्षेत्र आदी विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या विषयाचे कोर्सेस महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासन मान्यता प्राप्त संस्थांमधून चालविले जात असून परिषदेमार्फत वर्षातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात व या परीक्षा पास झालेले विद्यार्थी लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.

जून जुलै 2025 मधील जीसीसी टीबीसी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर, प्रज्ञा गायकवाड मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त केलेल्या तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा