बी.टी.शिवशरण.
टाइम्स 45 न्युज मराठी
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात जे मोठे आंदोलन उभे राहिले त्यातुन एकी असल्या नंतर आपण काय करू शकतो व नकारात्मक भूमिका घेणाऱ्यांना त्यांची जागा कशी दाखवून देऊ शकतो हे विद्यमान परिस्थितीत लोकशाही मधील ज्वलंत उदाहरण असू शकेल जर समाज एक झाला किंवा लोक एक झाले तर काय करु शकतात हे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आमरण उपोषणाने समाज एकवटला एकी झाली त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री यांना गावबंदी केली होती त्याचा मोठा फरक पडला समाज मोठा आहे समाजा पेक्षा कोणी मोठा नाही हा संदेश त्यातून दिला गेला मराठा आरक्षणाने नवी दिशा नवीन प्रेरणा दिली ती अशी की जो कोणी चुकीचे वागत असेल न्याय देऊ शकत नसेल अडवणूक करत असेल तर लोक जर एक झाले तर काय करु शकतात यातून राज्यातील जनतेला नवी दिशा नवी उमेद अशी मिळाली की लोकप्रतिनिधी जर योग्य काम करतं नसतील संविधानिक अधिकार नाकारत असतील तसेच जनतेच्या पैशांवर भ्रष्टाचार करत असतील त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी अशीच एकी करुन त्यांना जाब विचारला जाऊ शकतो गल्ली ते दिल्ली पर्यंत प्रशासकीय यंत्रणा जनतेची कामं दिरंगाई करुन अडवणूक करतं असेल तर मुजोर व भ्रष्ट अधिकारी नादान पुढारी मुजोर कार्यकर्ते नेते यांना याच पद्धतीने वठणीवर आणण्याचा प्रयोग समाज एकवटला तर केला जाऊ शकतो लोकशाही मध्ये जसे लोकप्रतिनिधी निवडून देण्याचे काम जरी असले तरी ते काम करत नसतील भ्रष्ट असतील तर त्यांना पळता भुई थोडी करण्याची ताकद समाजातील एकीच्या शक्ती मध्ये आहे हे सिद्ध झाले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला त्यातून राज्य एकवटले अगदी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी समाज संघटना राजकीय पक्ष महिला तरुणी गावागावांत एकवटल्या काही भागातील हिंसात्मक घटना वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन झाले ते स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच संपूर्ण देशाने पाहिले त्यामुळे सत्ताधारी विरोधक व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी यांना गुडघ्यावर आणण्याचे काम या आरक्षणाने केले याची इतिहास नोंद घेईल अशीच एकी समाजातील भ्रष्ट प्रवृत्ती मुजोर अधिकारी नादान नेते कार्यकर्ते यांना वेळच्या वेळी त्यांची जागा दाखवून देण्याची शक्ती एकवटलेल्या चळवळीत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा