Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०२३

कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या जीवनाची करूण कहाणी .

 


उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स ४५ न्यूज मराठी

                            पुर्वीच्या काळी भारत देशामध्ये शेतक-यांना जगाचा पोशिंदा म्हणून संबोधले जात होते, शेतकरी आपल्या शेतात कष्ट करून सुखी व समाधानी रहात होता.त्याकाळात शेतक-यांना निसर्गाची साथ ही लाभत होती परंतु आजकाल निर्सगाने बळीराजाची साथ सोडली आहे नको तेव्हा पाऊस पडतो पाहिजे तेव्हा पडत नाही हातातोंडाशी आलेली पिके ही गिळून टाकतो . यंदा पाऊस अत्यल्प पडल्याने दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला सोसाव्या लागत आहेत.पाण्या अभावी उभी पिके रानात जळून जाऊ लागली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या पदरी निराशाच आली आहे.जगाचा पोशिंदा शेतकरी आता कंगाल व कर्जाच्या खाईत लोटला जाऊ लागला आहे.त्यामुळे पिकांसाठी काढलेल्या कर्ज परत फेड होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग शेतीच्या कर्जापायी आत्महत्याचा मार्ग स्विकारू लागले आहे.पहिले कर्ज न भरल्यामुळे बॅंका व सोसायट्या या शेतकऱ्यांना परत कर्ज देत नाहीत त्यामुळे भारतात बळीराजाचे राज्य कधी येणार ? कर्जबाजारी शेतकरी कर्जमुक्त कधी होणार ? हा प्रश्न सतत शेतकरी वर्गाला भेडसावत आहे. 

             पुर्वीच्या काळी शेती व्यवसायाला प्रथम,व्यापार द्वितीय तर नोकरी कनिष्ठ समजले जात होते.पण आता काळ बदलला आहे.नोकरदारांना पाचवा सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे आता उत्पन्नाच्या बाबतीत नोकरी प्रथम,व्यापार मध्यवर्ती राहिला तर आता शेती कनिष्ठ व्यवसाय झाला आहे.नोकरदारांचा पगार शासनाच्या एका आदेशावर वाढतो पण शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात पिकवलेले मालाला त्याची किंमत व्यापारी लिलावात ठरवतात.त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांच्या मालाची आवक एखाद्या वेळेस जास्त झाली की त्यांचा माल काडीमोड भावाने विकला जातो.शेतीत पिकांसाठी केलेला खर्च ही त्याच्या पदरात पडत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग दु:खी होऊन खाली मान घालून आपला घरचा रस्ता धरतात. त्याच्या समस्यांकडे लक्ष द्यायला कोणत्याच नेत्या कडे वेळ नाही.

ऊसाचे पिक १८ ते २०महिने पोटच्या लेकरासारखा जपायचा त्याचा दर मात्र साखर कारखानदार ठरविणार त्यामुळे शेतकऱ्याला मिळेल त्यात समाधान मानावे लागते.एकीकडे साखरेचे दर वाढलेत ,खताच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत मजुरी वाढलेली आहे ,परंतु गेल्या दहा वर्षांपासून ऊसाला आहे तोच दर मिळत आहे.२०१० मध्ये प्रतीटन २५०० दर मिळाला होता आता २०२३ मधेही दर तेवढाच आहे खातांच्या किमती दहा वर्षात तिपटीने वाढल्या आहेत उसाचा दर मात्र आहे तोच शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार खाणे अशी अवस्था झाली आहे. शेतक-र्यांना या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढणे काळाची गरज आहे.अन्यथा शेतकरी मोल मजुरी उद्योग व्यवसाय करून स्वतः पुरतेच अन्नधान्य पिकवेन तेव्हा च जगाला शेतकऱ्यांच्या भावना आणी अन्नाची किमत कळेल. बळी राजाच्या संयमांची आणखी परीक्षा सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये .  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा