कोडोली ( कोल्हापूर )--प्रतिनिधी
प्रा. विश्वनाथ पाटील
टाइम्स 45 न्युज मराठी
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) " शैक्षणिक साधनांच्या उपयोगाने विद्यार्थी अध्ययन घटकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापन करताना विविध प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करावा", असे प्रतिपादन येथील कला शिक्षक अवधूत कुंभार यांनी केले. येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चार दिवसीय शैक्षणिक साधननिर्मिती कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
श्री. कुंभार यांनी यावेळी विविध प्रकारची दृक अप्रक्षेपित शैक्षणिक साधने कशी तयार करावीत, हे प्रत्यक्ष कृतीतून सादर केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बी. एड. च्या विद्यार्थी - शिक्षकांनी शैक्षणिक साधने तयार केली.
विद्यार्थी - शिक्षकांनी प्रथम व द्वितीय या दोन्ही अध्यापन पद्धतीतून तयार केलेल्या चित्र किंवा तक्ता आणि वीज, आवाज यांचा वापर करून तयार केलेली प्रतिकृती यांचे दिवाळीची सुटी संपल्यानंतर महाविद्यालयात प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात जाहीर केले. दोन अध्यापन पद्धतीतून तयार केलेल्या दोन शैक्षणिक साधनांचे परीक्षण करून विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्याची घोषणा त्यांनी केली.
विभागप्रमुख प्रा. अजित लोकरे यांनी प्रास्ताविक केले. वर्गप्रतिनिधी अनिरुद्ध कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुभाष चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. पूजा बनसोडे यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. श्रीमती गुलनास मुजावर, प्रा. संजय जाधव, प्रा. अतुल बुरटुकणे व्यासपीठावर होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, अनिल इंदुलकर, ग्रंथपाल सुरज इंगळे आणि तानाजी मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा