Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

शिक्षकांनी पत्रकारितेचे "ज्ञान व कौशल्य "आत्मसात करावीत--- दिलीप पाटील (पत्रकार)

 


कोडोली ( कोल्हापूर )--प्रतिनिधी

प्रा. विश्वनाथ पाटील 

टाइम्स 45 न्युज मराठी

                         कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) " शिक्षकांनी बहुश्रुत होताना केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही. त्यासाठी त्यांनी पत्रकारांसारखे विविधांगी अनुभव घेतले पाहिजेत. प्रसंगी त्यांनी पत्रकारितेचे ज्ञान व कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत," असे आवाहन येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन विस्तार विभागामार्फत येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सुरू असलेल्या ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या नामफलक अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख, प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.


   याप्रसंगी पत्रकार रवींद्र पोवार आणि विश्वास साळोखे उपस्थित होते. कार्यक्रमास यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.


    पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी बी. एड. प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर सर्व क्षेत्रातील किमान दहावी उत्तीर्ण असणार्‍यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी केले. पत्रकारितेचे विद्यार्थी जॉन जगताप यांनी स्वागत केले. जयसिंग बोरगे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा