संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
*तुळजापुर तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन नागरीकांना पिण्यासाठी पाणी राखीव ठेवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक (भाऊ) जगदाळे यांनी केली. असुन
संपुर्ण मराठवाड्यात यावर्षी पावसाने ओढ दिली असून खरीप पिक उत्पादनात घट झाली आहे.
रब्बीची पेरणी 10 टक्केच्या जवळपास झाली असून येत्या कांही दिवसात दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार आहे.
जनावरांना चाऱ्याचा ही प्रश्न निर्माण होणार आहे. तर नागरिकांना गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागेल.
यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरीत लक्ष देवून तलावातील पाणी राखीव ठेवावे .
तुळजापुर तालुक्यात महाराष्ट्राची कुलस्वामीनी माता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्रप्रदेशातुन लाखो भाविक दररोज येतात तसेच नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी दररोज असंख्य पर्यटक येत असतात या दोन्ही शहरास नळदुर्ग येथील बोरी धरणातुन पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. याच धरणातुन वीस ते पंचवीस गावांनाही पिण्यास पाणी पुरवले जात असून ,पाण्याचा उपसा वाढल्याने व तीव्र उष्णतेमुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी धरण परिसरात पाऊस कमी झाल्याने बोरी धरण ,खंडाळा धरण,व परिसरातील बाभळगाव तलाव, तीस टक्केच भरले आहेत. हे पाणी जेमतेम मार्च एप्रिल पर्यंत पुरेल एवढेच आहे.
याकरीता जनावरांना प्राण्यांना व नागरीकांना पिण्यासाठी पुढील काळात पुरेल येवढे पाणी राखीव ठेवावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. अशोक (भाऊ) जगदाळे यांनी केली आहे.
नळदुर्ग बोरी धरणातील शेतीला पाणी द्यावे ही भुमिका योग्य नाही शहराची लोकसंख्या दहा पंधरा हजार नसुन ती पन्नास हजाराच्या जवळ गेली आहे. तसेच बँरेज एक मधुन नळदुर्ग पाणी फिल्टरटाकी पर्यंतचे अंतर चार किमीचे असून पाईपलाईन ही नाही. मग पाणी पुरवठा करणार तरी कसा असेही जगदाळे यांनी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा