Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०२३

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळेल ही अफवा-- ओबीसी नेत्यांचा केला संभ्रम दूर --मुख्यमंञी, एकनाथ शिंदे यांचं मोठे विधान...

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                          मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन चर्चा झाल्याचं बोललं जातंय. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी समाजाने मनामध्ये कोणताही संभ्रम ठेवू नये. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याच्या अफवेमुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. पण, तो आता दूर करण्यात आला आहे.

सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी माझी भेट घेतली. छगन भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनामधील शंका मी दूर केली आहे, असं शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


एकनाथ शिंदे म्हणाले की, शासनाने जो जीआर काढला होता, त्याच्या मेरिटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातात. कुणबी प्रमाणपत्र व्हेरिफाय झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल ही अफवा ओबीसी नेत्यांमध्ये होती. त्यामुळे छगन भुजबळ आणि इतरी ओबीसी नेते मला भेटले. त्यानंतर त्यांच्या मनातील शंका दूर करण्यात आलीये, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

 कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने संभ्रम मनात बाळगू नये. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे जे करावं लागेल तर सर्व आम्ही करु. मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी नेते आणि छगन भुजबळ यांच्या शंका दूर केल्या आहेत, असंही ते म्हणाले


सौजन्य ;--

माहिती सेवा ग्रुप--पेठावडगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा