संपादक---- हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.--9730 867 448
मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला केली आहे. साताऱ्यात दोन तरुणांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र सादर केलं. यावेळी उदयन भोसले यांनी हे विधान केलं.
"मराठा तरुणांनी रक्तानं लिहिलं पत्र"
मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक पंढरपूर ते सातारा पायी यात्रा करत आज साताऱ्यात दाखल झाले.
त्यांनी 'जलमंदीर पॅलेस' या निवासस्थानी उदयनराजेंची भेट घेतली. या दोन्ही युवकांचं उदयनराजेंनी कौतूक करुन मराठा आरक्षणप्रश्नी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारवर टीका केली
तोपर्यंत निवडणुका घेऊ नका
यावेळी उदयनराजे म्हणाले की, "जर तुम्ही तेढ निर्माण करत असाल तर आज तुम्ही पाहताय उद्रेक तर होणार! आज या तरुणांनी रक्तानं पत्र लिहिलं आहे. जरांगे पाटील या व्यक्तीवर गावात उपासमारीची वेळ आली.
जर तुम्ही या प्रकरणावरुन राजकारण करायचंच असेल तर असं करा ना, की जोपर्यंत जनगणना होत नाही, प्रत्येकाला तुम्ही न्याय देत नाही त्यांचं आरक्षण फिक्स करत नाही, तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका ना! बेसिक गोष्ट म्हणजे जनगणना करा ना, कशाला कोर्ट कचेऱ्या दाखवताय?"
...तर सर्वस्वी सरकार जबाबदार
"माझी सरकारला हात जोडून विनंती आहे की तुमच्या कितीही राजकीय महत्वाकांक्षा असतील पण कोणतीही किंमत मोजा पण सर्वसामान्यांचा विचार करा. मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत ज्या काही आत्महत्या झाल्या आहेत. त्या जर अशाच होत राहिल्या तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार असणार. महत्वाच्या पदांवर बसलेले सर्वजण याला जबाबदार असतील, अशा शब्दांत भोसले यांनी सरकारला इशाराही दिला.
सरकार सोयीप्रमाणं काम करतंय
सरकारला माहिती नाही असं
नाही पण मूग गिळून बसायचं. सोयीप्रमाणं एक महिना, दोन महिने असं किती महिने सरकार करत राहणार. ऐन तारुण्यात तुम्ही त्यांच्यासाठी काही केलं नाहीतर म्हातारपणी काय करणार ते. एक पिढी येईल, दुसरी येईल तरी हे असंच राहणार का? मी हे द्वेषापोटी बोलत नाही तर मनापासून कळकळीनं आवाहन करत आहे, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा