Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

*वाखरी ता. पंढरपूर येथील "माऊली हॉस्पिटल" ची सखोल चौकशी करून कारवाई करावी---- बच्चन साठे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

                          पंढरपूर हे जगभरातील मोठं तिर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते त्या पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी च्या भेटिला महाराष्ट्र,व भारतातुन भाविक भक्त येतात उद्या कार्तिकी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने वारकरी संप्रदाय डिंड्या येतात त्यामध्ये लहान मुले, महिला वयोवृद्ध व्यक्ती असतात वाखरी गाव पंढरपूर रोडवर असुन माऊली हॉस्पिटल लगतच आहे पायी येनाऱ्या भाविक भक्तांना माउली हॉस्पिटल च्या समोरुन पंढरपूर कडे जावा लागते वाखरी येथे कार्तिकी वारीला मोठ्या प्रमाणात गुरांचा बाजार भरतो त्या ठिकाणी गोर गरीब शेतकऱ्यांना मुक्कामी उघड्यावर राहवं लागते अश्या काळात माऊली हॉस्पिटल चे डॉक्टर सचिन चव्हाण यांनी बेकायदेशीर पणे त्याच्या माऊली हॉस्पिटल मधुन निघालेला जैववैद्यकिय कचरा हॉस्पिटलच्या समोर उघड्यावर टाकून जाळला जातो त्या कचऱ्यात इंजइक्शन,सुया,रक्ताने माखलेले कापसाचे बोळे,जखमी रुग्णांवर उपचार केलेल्या ब्यॅडेज पट्या, सलाईन बाटल्या, पाईप्स, रिकाम्या झालेल्या गोळ्या औषधांच्या बाटल्या खोकी व इतर सर्वं हॉस्पिटल मधुन निघालेला जैववैद्यकिय कचरा मोठ्या प्रमाणात जाळुन प्रदुषण पसरवुन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे 


त्याच्या माऊली हॉस्पिटल मध्ये लहान मुले महिला वयोवृद्ध व्यक्ती गरोदर माता डिलेवारी साठी ऍडमिट असतात उघड्यावर जाळलेल्या जैववैद्यकिय कचऱ्यातून हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटला प्रदुषणाचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे हे बेजबाबदार डॉक्टर ऐकिकडुन औषध अन् दुसरीकडे विष पसरविण्याचे काम करित आहेत रोड लगत टाकलेला कचऱ्यात इंजइक्शन सुया अर्धंवट स्वरुपात जळाल्या आहेत त्यामध्ये ऐक मोटारसायकल स्वार गाडीवरून पडलेला आम्ही पाहता हा डॉक्टरांचा अनागोंदी कारभार दिसून आला त्या कचऱ्यावर मुकी जनावरे गाई गाढवे कुत्री व इतर प्राणी पोटाची खळगी भरण्यासाठी प्लॅस्टिक चगळत उभा असतात मुक्या जनावरांचा तोंडात इंजइक्शन सुई सलाईन पाईप्स चुकुन गेली तर मुक्या प्राण्यांना सुद्धा धोका पोहोचू शकतो किंवा रस्त्यावर फिरनारी वेढसर मनोयात्रिकी वयोवृद्ध त्या कचऱ्यात काहितरी खायला मिळेल ह्या आशेने उलता पालत करत असतात


 त्यांना इन्फेक्शन होऊन मानव सजिव सृष्टिला ही धोका निर्माण होण्याचा संभव नाकारता येत नाही वाखरी गाव त्या ठिकाणी वसलेलं असुन प्रदुषणाचा प्रादुर्भाव लोकांच्या जिवावर बेतू शकते त्यामुळे अशा बेजबाबदार डॉक्टरांवर वेळीच कार्यवाही करणे आवश्यक असते उघड्यावर जैववैद्यकिय कचरा टाकुन जाळुन प्रदुषण पसरवने हे पर्यावरणातिल सजिव सृष्टिला हानिकारक ठरेल म्हणून माऊली हॉस्पिटल ची सखोल चौकशी करून प्रशासन स्तरावरुन बेजबाबदार डॉक्टर वर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 29/11/2023 रोजी ता आरोग्य अधिकारी पं समिती कार्यालय पंढरपूर यांच्या समोर बेमुदत बोंबाबोंब आंदोलनास बसनार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बच्चन साठे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा