अकलूज ----प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित शंकरराव मोहिते महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्रा.डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची भूगोल विषयातील पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील प्रो.नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसिंचन स्त्रोत व बदलत्या पीक प्रारूपांचा भौगोलिक अभ्यास या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधन पूर्ण केले.या उच्च विद्या विभूषित पदवीच्या मौखिक परीक्षेसाठी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे भूशास्त्र विभागाचे संचालक डॉ.अविनाश कदम रेफरी डॉ.एस.एम.मुलानी सोलापूर,डॉ.वडते सर नागपूर हे होते.यावेळी प्राचार्य डॉ.एच.बी. राठोड,प्राचार्य डी.जी.माने प्रो. प्रमोद खडके तसेच विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख यांनी यापूर्वी शिक्षणशास्त्र विषयातून पहिली पीएच.डी पदवी मिळवली आहे. तसेच ते युजीसी नेट परीक्षा देखील उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील सौ. सुलक्षणादेवी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील,दिपकराव खराडे पाटील,प्रदीपराव खराडे पाटील सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे, विभाग प्रमुख डॉ.संतोष गुजर व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ.चंद्रशेखर ताटे-देशमुख यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा