इक्बाल --मुल्ला (पत्रकार )
सांगली.
मो.8983 587 160
हारी हुयी बाजी को जितने वाले को ही बाजीगर कहते हें ! "अखेर सिकंदर शेख " झाला" महाराष्ट्र केसरी "कुस्तीच्या" आखाड्यात गतवर्षी झालेल्या अन्यायाला वाचा फोडत तडाखेबंद कुस्तीचा नजराणा पेश करत , हजारो कुस्ती शौकिनांचे "डोळ्याचे पारणें" फेडत अवघ्या एका मिनिटात "झोळी " डावात "शिवराज राक्षे "या अवाढव्य पैलवानाला आसमान दाखवून 2023 चा नवा महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी चा बहुमान मिळवणाऱ्या पैलवान" सिकंदर शेख" यांचे सर्वप्रथम अभिनंदन !
गेल्यावर्षी माझ्या लेखामध्ये " आगामी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच असणार हें भाकीत केले होते. सिकंदर ने आपल्या अंगभूत कौशल्याने ते ते भाकीत "तंतोतंत" खरे केले .
कोल्हापूर च्या गंगावेस च्या या आक्रमक पैलवानाच्या "वादळात" कोणताच पैलवान टिकू शकला नाही . अतिशय "गुणवान" असणारा शिवराज राक्षे हा "तगडे" आव्हान देईल असा व्होरा असताना 1 मिनिटात सिकंदर ने त्याला चितपट करून कुस्तीच्या पटाचे आपणच -सम्राट -आहोत हें पुन्हा एकदा सिद्ध केले.
आगामी काळात सिकंदर शेख याची "डब्बल महाराष्ट्र केसरी "या पदाकडे त्याची आगेकूच सुरु होईल .
अत्यंत "हलाखीत" कुस्तीची उज्वल परंपरा टिकवून छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असणारी कुस्ती "परंपरेची" जपणूक करणाऱ्या सिकंदरचे मनापासून "कौतुक" करावे लागेल .
"नवोदित "पैलवानांना "आदर्शवत" असणारा "महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ" देखील अभिनंदनास पात्र आहे . कारण त्यांनीही कुस्तीची परंपरा "टिकवून" ठेवली आहे .
आगामी काळात सिकंदर डब्बल नव्हे तर टिब्बल महाराष्ट्र केसरीची गदा पटकावेल हा "आशावाद" आहे .
इकबाल बाबासाहेब मुल्ला ( पत्रकार ) संपादक - सांगली वेध ,
संपादक - वेध मीडिया न्यूज ,सांगली . मोबाईल - 8983587160
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा