Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

माढा मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही--- खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.

 


नातेपुते ----प्रतिनिधी

श्रीकांत बाविस्कर

टाइम्स 45 न्यूज मराठी.

                      माढा मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न मिटवल्याशिवाय येत्या लोकसभेचा अर्ज भरणार नसल्याचे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपुते येथे मधुर मिलन कार्यालयामध्ये दिपावली स्नेहमेळावा निमित्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शहाजी पाटील आमदार जयकुमार गोरे माजी आमदार दीपक साळुखे पाटील जिल्हा

 दुध संघाचे अध्यक्ष रणजित भैय्या शिंदे , राष्ट्रवादी चे नेते उत्तमराव जानकर चेतनसिह केदार के के पाटील माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे ज्योतीताई पाटील नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्षा चव्हाण राजकुमार पाटील बाळासाहेब सरगर बाळासाहेब वावरे योगेश बोबडे महेश चिवटे पांडुरंग वाघमोडे संजय देशमुख माऊली पाटील लक्ष्मण गोरड युवराज वाघमोडे आदी उपस्थित होते.



       ते पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले की मला काही लोक समाज माध्यमातून टोल करतात परंतु मी माझ्या कामानेच उत्तर देणार आहे पक्षांकडून मला सांगितले आहे की पुढे काम करत चला कोणाच्या विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका आज स्टेजवर कोण आहे किंवा नाही हे पाहू नका पार्टी तिकीट दिल्यानंतर एका स्टेजवर सर्व येतील याची काळजी करू नका तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांनाच असतो परंतु पार्टी ठरवेल. मी कोणाविषयी मनात राग धरत नाही.माळशिरस तालुक्यात रस्त्यांसाठी 150 कोटी रुपये भरघोस निधी दिला आहे. अडीच वर्षे सत्ता नसताना मला व आ जयकुमार गोरे यांनी खूप त्रास दिला परंतू घाबरलो नाही. निरा देवधर प्रकल्पाचे थोड्या दिवसात टेंडर होऊन काम चालू होईल. त्यामुळे पुढील निवडणूक पाणी साठी होणार नाही. फलटण पंढरपुर रेल्वेमार्ग काम चालू होईल. 


  सदाभाऊ खोत म्हणाले, "सध्या शेतकरी अडचणीत आहे दुधाचा दर मिळाला पाहिजे. पाऊस अभावी चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतकर्यांना लाईट मोफत दिली पाहिजे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम खूप चांगले आहे.राज्यला खरी दिशा देवेंद्र फडणवीस हेच देवू शकतात त्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहिले पाहिजे. महाविजय 2024 प्रमुख आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्हिडिओ चित्रीकरणा द्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी आ शहाजी बापू पाटील म्हणाले की," खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे सांगोला तालुक्याला आठ टीएमसी पाणी मिळाले आहे त्यामुळे तालुका सुजलम सुफलम होणार आहे तालुक्याच्या कोणत्याही काम मुंबई अथवा दिल्ली येथे असो खा रणजीत सिंह नाईक निंबाळकर त्यासाठी तत्पर असतात त्यामुळे माढा लोकसभेसाठी खासदार निंबाळकर हेच खासदार व्हावेत हीच माझी अपेक्षा आहे.

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की," माझे खासदार रणजीतसिंह दादा यांचे भावाप्रमाणे नाते आहे त्यामुळे या नात्यांमध्ये कोणीही दुरावा आणू शकत नाही रणजितसिंह यांचे काम वाखडण्यासारखे आहे. यावेळी दीपक साळुंखे म्हणाले की," पाठीमागील निवडणुकीमध्ये आम्ही विरोधात होतो परंतु आता आम्ही एकत्र आलो आहे त्यामुळे दादा येत्या निवडणुकीत तुम्ही टेन्शन घेऊ नका सांगोला तालुका मोठ्या लीड देईल.त्याचबरोबर रणजीत शिंदे म्हणाले की ,"करमाळा आणि माढा तालुक्यामधून आम्ही दोन लाखाचं लीड आपणास देऊ. 


चौकट : हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य के के पाटील नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर व संघटन सरचिटणीस संजय देशमुख जिल्हा चिटणीस शशी कल्याणी आदींनी प्रयत्न केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा