अकलुज ----प्रतिनिधी
शकूर तांबोळी
टाइम्स 45 न्युज मराठी.
दिनांक 21 व 22 नोव्हेंबर 2023 वार मंगळवार व बुधवार रोजी संपन्न झालेल्या विभागस्तरीय "वेटलिफ्टिंग (भारोत्तलन)" स्पर्धेत प्रशालेतील
कु.अस्मिता कशिलिंग काळे-पाटील या विद्यार्थिनीने "प्रथम क्रमांक" मिळवून घवघवीत यश संपादन केले,त्यामुळे तिची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी विद्यार्थिनीचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते -पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,संस्थेच्या संचालिका तसेच प्रशालेच्या सभापती .कु. स्वरूपाराणी मोहिते -पाटील(दीदीसाहेब) ,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव .हर्षवर्धन खराडे,स्थानिक प्रशाला समितीचे सर्व सदस्य,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता गायकवाड यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेचे क्रीडा शिक्षक अर्जुन बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा