**टाइम्स 45 न्युज मराठी*
**मो-9730 867 448**
भाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.
या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे.
यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करवयाची.
या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे.
जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
**भाऊ बीजेची कथा*
एका कथेनुसार सूर्याला दोन अपत्य होते मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्यांची नावे होते सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला शास्त्री भेटायला खूप कमी जात असे यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाढणारे ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे आणि त्यामुळेच यमुनेने यमाला खूप कळकळीची विनंती केली त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध द्वितीया होय यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे अगदी आनंदाने अगर्तित्य केले पाटावर बसवून त्याला ओवाळले
यमानेही बहिणीसाठी साडी चोळी अलंकार अनेक भेट वस्तू तिला दिल्या आणि म्हणाला यमुने माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून तेव्हा यमुना म्हणाली मला तर कसली कमी नाही नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको त्याचे मृत्यूपासून संरक्षण करावे
या माने यमुनेला तथास्तु म्हटले आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरे करतात या दिवशी बहिण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच या मागील उद्देश होय
**संकलन--सदानंद पाटील,रत्नागिरी **
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा