*प्रेमनाथ रामदासी*.
*साहित्यिक-कवी-लेखक*.
*दूर अरण्यात एक ब्रह्मकमळ होतं*.... *कोणतीही इच्छा पूर्ण करणारं देशोदेशीच्या राजकुमारांना ते ब्रह्मकमळ हवं होत*..... *त्यासाठी सात निळे डोंगर पार करावे लागत होते* *एक डोंगर ओलांडला की वाटेत मद्याचे तो साद घालायचे राजकुमाराला मोह व्हायचा*... *तो त्या मद्याचा घोट प्यायचा आणि काही क्षणातच त्या राजकुमाराचा दगड व्हायचा*... *हे टाळूनही एखादा पुढे गेलाच तर एक प्रमत्त श्यामल डोळ्यांची परी साद घालायची*.. *ते अप्रतिम लावण्य बधून* *राजकुमार विरघळायचा*.. *त्याचाही दगड व्हायचा*... *एक मात्र निश्चयी राजकुमार होता*....
*ब्रह्मकमळ मिळवायचंच या ध्यासाने तो पेटून उठला*... *वाटेत त्याला मद्याच्या तळ्याने साद* *घातली*... *पण त्याचे लक्ष होते ते त्या ब्रह्मकमळाकडेच* ! *पुढे सुंदर परीने आपले बाहु पसरले*... *पण तरीही राजकुमार ढळला नाही*... *पुढे रत्नजडीत अलंकाराच्या राशी त्याच्या पायाशी आल्या*... *पण तरीही राजकुमार अविचल राहिला*... *अखेर तो निश्चयी राजकुमार सात डोंगर ओलांडून पोहचला अन् त्याला ते ब्रह्मकमळ मिळालं* !
*कथा प्रतिकात्मक आहे. यशाचं ब्रह्मकमळ मिळवायचं असेल तर फक्त इच्छा असून चालत नाही... ध्यास लागतो*... *अभ्यास लागतो*... *सुखाच्या मोहवाटा टाळून सर्वस्व झोकून द्यावं लागतं*... *ही सर्व गुणवैशिष्ट्ये असणारं एखादं नेतृत्व मिळालं तर*...?
*अर्थातच त्या गावाचा सर्वांगिण विकास झाल्याशिवाय राहणार नाही*. *अकलूजच्या आजच्या समृद्ध रूपाकडे पाहिलं की जाणवतं, ज्येष्ठांना बरोबर घेवून जाणारं*... *तरुणांना दिशा देणार... झोपलेल्यांना जागं करणारं... चालणाऱ्यांना धावण्याचं बळ देणारं*.. *आणि धावणाऱ्यांना विधायक दिशा दाखवणारे... नेतृत्व अकलूजला मिळालंय*.. *ते म्हणजे धैर्यशिलभैय्या* !
*दीपस्तंभ उभारणं सोपं असतं*... *पण दीपस्तंभ होणं कठीण असतं*... *त्यासाठी उसळणाऱ्या लाटात स्वतःला खंबीरपणे उभं करून वाट चुकलेल्या गल्वतांना दिशा दाखवण्याचा खंबीरपणा लागतो. लव्हाळी होणं सोपं असतं पण महावृक्ष होणं कठीण असतं*.. .*कारण त्यासाठी खडकाळ भूमीत स्वतःला गाडून घ्यावं लागतं*...
*भैय्यासाहेबांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग झेप आजही भल्याभल्यांना चकीत करून सोडते*... *पण या सर्वाच्या पाठीमागे आहे ती* *भैय्यासाहेबांची प्रगल्भ विचारदृष्टी आणि अखंड परिश्रमाची तयारी*!
*चार-पाच वर्षांपूर्वीची घटना*... *विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त एका नामवंत वक्त्याचं व्याख्यान ठेवण्याचं ठरलं*... *फोनवर त्यांच्याशी संपर्क झाला*, *मी लगेच पत्र तयार केलं. त्यात व्याख्यात्यांना लिहिलं*... *यंदाच्या व्याख्यानमालेसाठी आम्ही तुमची निवड केलेली आहे*... *पत्र भैय्यांसमोर सहीसाठी ठेवलं... भैय्यांनी पत्र वाचलं माझ्याकडे पाहून स्मित केलं*.. *पत्रातल्या त्या ओळीला अंडरलाईन केली व माझ्याकडे पाहून म्हणाले, हे वाक्य बरोबर नाही*... *व्याख्याते मोठे आहेत. त्यांची निवड करणारे आपण कोण? पत्रातील भाषा नम्र पाहिजे*... *चूक माझ्या लक्षात आली. भैय्यांचा तो* *नम्रपणा पाहून ध्यानात आलं कि जर मोठे व्हायचे असेल तर तुम्ही अगोदर लहान व्हा़ला पाहीजे*. !
*आपल्या कृतितुन समोरच्याला माणसांना जिंकणारे भैय्यासाहेब आत्ता खासदार व्हायलाच पाहिजेत*.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा