Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर 2023 24 चा उसाचा सुधारित दर 2600 रुपये प्रति मेट्रिक टन

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

                             श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन 2023-24 गळीत हंगामासाठी गाळपास आलेल्या ऊसासाठी सुधारित दर रक्कम रू 2600 प्रति मे टन प्रमाणे देण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. संचालक मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. सुधारित दरानुसार गाळपास आलेल्या ऊसाची दुसऱ्या मस्टर ची पुढील 10 दिवसाची बिले सभासद, ऊस उत्पादक तसेच बिगर ॲडव्हान्स यंत्रणेची तोडणी वाहतूक बिले सोमवार दिनांक 20/11/2023 रोजी संबंधित सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे बँक खात्यावर वर्ग झाले असलेची माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. कारखाना व्यवस्थापनाने सर्वात आधी रक्कम जमा करणेचा निर्णय घेतल्याने शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून कारखान्यास ऊस पुरवठा वाढू लागला आहे. तसेच बिगर ॲडव्हान्स तोडणी वाहतूक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कारखान्यास ऊस पुरवठा करत असून त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने व विश्वासाने कारखाना गाळप हंगाम प्रगतीपथावर असून कारखाना व्यवस्थापनाने 4 लाख मे टन गाळपाचे उद्धिष्ट निर्धारित केले असून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठविणेचे आवाहन व्हा.चेअरमन ॲड. मिलींद कुलकर्णी यांनी यावेळी केले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा