उपसंपादक ......नूरजहाँ शेख
टाइम्स ४५ न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांवमधील मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बालमशहा कोरबू यांनी ऊस तोडणी कामगारांना ५०० मोती साबणाचे वाटप करून गोर गरिबांची दिवाळी सुंगधमय केली .यंदा माळशिरस तालुक्यात उशीरा साखर कारखान्याचा हंगाम सुरू झाला आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर सिझन चालू झाल्यामुळे एकीकडे ऊस तोडायचा की दिवाळीचा बाजार आणि फराळ बनवायचा या धावपळीत असताना काल नरक चतुर्दशीच्या संध्येला मोती साबणाचे वाटप करून उस तोड कामगारांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या .
मानवता हाच खरा धर्म माणुसकी हिच माझी जात ....इन्सान हू इन्सान के काम आऊंगा. ...दुनियसे और साथ क्या ले जाऊंगा ... म्हणीत गरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप समाधान मिळते असे ते म्हणाले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा