Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

मराठाआरक्षणाच्या आंदोलनाला "महाराष्ट्र विकास सेना" पक्षाचा पाठिंबा तालुक्यातील आंदोलनाला दिली पक्षप्रमुख "किरण साठे" यांनी भेट.

 


विशेष -प्रतिनिधी--कासिम (राजु)मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी.

                          महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात सामील करण्यात यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी ता अंबड जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी,अकलूज, माळशिरस, नातेपुते,वेळापूर,मळोली,तांदुळवाडी,खंडाळी येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाला प्रत्येक्ष उपस्थित राहून भेटी दिल्या आहेत.तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने लेखी पत्र लिहून उपोषणकर्ते यांच्याकडे पाठिंबा सोपविण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते दत्ता कर्चे,राज्य समन्वयक अजित साठे,धनगर समाजाचे नेते उल्हास वाघमोडे,रोहित वाघमोरे,रफिक सय्यद उपस्थित होते.



मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देत माळशिरस तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात साखळी उपोषण सुरू केली आहेत.सदर आंदोलनाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी भेटी देवून लेखी पाठिंबा दिला आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी,सातारा जिल्हाधिकारी,पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून मराठा व धनगर आरक्षणाचा 

प्रश्न सोडवण्यासाठी निवेदने दिली आहेत.आणि सोलापूर जिल्ह्यातील,माळशिरस,सांगोला,पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर संबंधित मागणीसाठी ठिय्या आंदोलन केली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा