Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

"पोलीस प्रशासन झाले सुस्त-- आणि चोर झाले मगरमस्त." धाराशिव जिल्ह्यात सन 2022 /23 मध्ये 493 चोऱ्या झाल्या मात्र तपास फक्त 73 प्रकरणाचे.

 


संपादक---- हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.--9730 867 448

                    प्रेमचंद बजरंग मुंडे रा. पवारवाडी ता. जि,धाराशिव हे गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये शेतकरी साजरे करत असलेले "वेळा आमावस्या " च्या निमित्ताने पवारवाडी येथे गेले होते त्यांचे धाराशिव येथेही घर असून त्या घराला कुलूप लावून प्रेमचंद मुंढे हे आपल्या गावी "वेळ आमावस्या " साजरी करण्यासाठी पवारवाडी ला गेले होते या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने प्रेमचंद मुंढे यांच्या घरातील 7 तोळे सोने 71 हजार रुपये रोख आणि चांदी 1 किलो असा लाखोंचा ऐवज घेऊन नौ दो ग्यारह झाला. त्याची फिर्याद प्रेमचंद मुंडे यांनी धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशन मध्ये दिली होती माञ चोरी होऊन एक वर्ष झाले पोलिस प्रशासना कडून अद्याप तपास केला नाही वारंवार पोलिस प्रशासनास विनंती करुन सुध्दा तपास लावला नाही हा काय प्रकार आहे न उलघडणारे कोडे असुन देवाच्या नंतर माणुस न्याय मिळेल म्हणुन पोलिस प्रशासना कडे "आशाळशभूत नजरेने पाहत आसतो माञ हे प्रशासन न्याय देण्याच्या ऐवजी अन्यायाची भूमिका प्रामाणिकपणे करत आहे. हे जनता जनार्धनाचे दुर्दैव म्हणणे वावगे ठरणार नाही तसेच 



 स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव तात्कालिन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव व सद्या कार्यरत असलेले कर्मचारी यांच्या कार्यकाळामध्ये दि. 23/09/2022 ते 04/07/2023 पर्यंत धारशिव जिल्हामध्ये कहरच झाला यांच्या कार्य काळात जिल्ह्यात 493 चोऱ्या झाल्या माञ त्यातील 73 चोऱ्याचे प्रकरण उघडाकिस आल्या. राहीलेल्या 420 चोऱ्यांचे काय झाले ? हा कळीचा मुद्दा असुन चो करणाऱ्या चोरांना वरदहस्त कोणाचा. या कार्यकाळामध्ये जे कर्मचारी माहीतीगार म्हणुन नेमणुकीस आहेत व काही कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बक्षिसपत्र आहेत मग 420 चोऱ्या का उघडकीस आल्या नाहीत.? उघड न आलेल्या चोऱ्यामध्ये वैयक्तीक प्रेमचंद मुंढे यांच्या एक चोरीचे प्रकरण आहे. शिवाय मुंढे यांच्या घरी चोरी झाल्या कारणाने त्यांच्या घराची आर्थिक परीस्थिती बिकट बनली आहे.तरी धाराशिव चे पोलिस अधिक्षक यांनी या कार्यकाळात कार्यरत आसलेल्या पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाची चौकशी करुन त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा आहवाल सादर करावा अशी मागणी प्रेमचंद मुंडे यांनी धाराशिव चे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली असून


या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर 15 दिवसांमध्ये कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावी असे न केल्यास दि.22/11/2023 रोजी वार बुधवार ठिक 01:00 वाजता पवारवाडी गावातील बिभिषण विठ्ठल मुंढे यांच्या शेतातील (उमाट च्या) विहीरीमध्ये जलसमाधी घेणार. असल्याचा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे


तरी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे धाराशिव जिल्ह्याचे देवदुत असुन आपणांकडे प्रेमचंद मुंडे यांनी न्यायाची अपेक्षा केली आहे

तरी धाराशीचे पोलीस अधीक्षक उर्वरित 420 चोऱ्यांचे तसेच प्रेमचंद मुंडे यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास करून न्याय देतील का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

 सद् रक्षणाय् खल् निग्रहणाय् या ब्रीद वाक्या ला शोभेला असे कार्य करतील काय?


माहीतीस्तव ही प्रत धाराशिव चे 

मा. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया कडे सादर केली आहे. 


प्रेमचंद बजरंग मुंढे,

रा.पवारवाडी ता.जि. धाराशिव. मो.नं. 9604895947

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा