अकलुज प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 न्युज मराठी.
दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अकलूजमधील सभागृहात दिपावली पहाट गाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शिक्षकांकरिता शिक्षक सहकारी पतसंस्थेमध्ये आयोजित केलेल्या या अनोख्या कार्यक्रमात दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली संगीत विशारद भगवंतराव कदम उर्फ ह.भ.प.बाबा महाराज ढवळीकर यांचे तबलावादन,संतोष महामुनी यांचे संवादिनी वादन-गायन, आणि सोमेश्वर तांदळे, शिवलिंग नकाते,संजय पाटे,संचालक आत्माराम गायकवाड,स्नेहा शिंदे,राम काटकर यांच्या सुश्राव्य आवाजात दिवाळी गीते,अभंग, गौळणी आणि भैरवी गीते सादर झाली.या कार्यक्रमाचे शैलीदार निवेदन सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम गुजर आणि सुहास उरवणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती क्षीरसागर,केंद्रप्रमुख रमजान शेख,संजय देवकते,अशोक राजगुरू,मनोहर एकतपुरे, कृष्णदेव तुपे,पतसंस्थेचे संचालक अशोक पवार,पांडुरंग मोहिते, संस्थेचे सचिव सतेज दिवटे, कर्मचारी हनुमंत तेलसंग यांच्यासह शिक्षक श्रोता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच राबविल्या गेलेल्या दिवाळी पहाट गाणी यासारख्या संस्कृतिक स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या अध्यक्ष,उपाध्यक्षासह सर्व संचालकांनी योगदान दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा