इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
टाइम्स 45 न्युज मराठी.
मोबाईल-8378081147
निमसाखर येथे मका व ज्वारी पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु मागील पंधरा दिवसामध्ये मका व ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोपेटरा फुर्जिंपर्डा) प्रादुर्भाव दिसून येऊ लागला होता.यावर कृषी विभागाद्वारे क्षेत्रीय भेटी आयोजित करुन पिकांची पाहणी करण्यात आली.
लष्करी अळी नियंत्रणासाठी तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर, मंडळ कृषी अधिकारी श्री सतीश महारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग व ग्रामपंचायत निमसाखर यांचेद्वारे दिनांक22/11/23 व २३/११/२०२३ रोजी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये कृषी पर्यवेक्षक श्री सचिन चितारे व कृषी सहायक श्रीमती श्रद्धा घोडके -फडतरे यांनी लष्करी अळी नियंत्रणासाठीच्या उपाययोजना, कामगंध सापळ्यांचा वापर, वापरायची कीटकनाशके त्यांचे प्रमाण इत्यादीवर सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. यावेळी सरपंच श्री धैर्यशील रणवरे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक अधिकारी श्री.सुधाकर भिलारे व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा