इंदापूर तालुका----- प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
देशाचे माजी कृषिमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री" शरद पवार" यांच्या वाढदिवसानिमित्त- पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण भैय्या माने यांच्या संकल्पनेतून व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्यावतीने रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत इंदापूर येथील शंकरराव पाटील सांस्कृतिक भवन कालठण रोड ,इंदापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील व कार्याध्यक्ष महारूद्र पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास स्मार्ट वॉच किंवा एअर बर्ड्स भेट दिला जाणार आहे, तरी या रक्तदान शिबिरात बहुसंख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन- इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा