Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

अन्-- खासदार," सुप्रिया सुळे" यांना मोह अनावर झाला....

 


टाइम्स 45 न्युज मराठी

             कोल्हापूर शहर ज्याने अनुभवले तो या शहराच्या प्रेमात पडतो. कोल्हापूर म्हणजे कलापुर.येथे अनेक देशी विदेशी पर्यटक येत असतात.२४ नोव्हेंबर २०१८ रोजी खास. सुप्रिया सुळे या कोल्हापूर येथे आल्या होत्या. 

*_करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात रोज हजारो पर्यटक दर्शनासाठी येतात आणि मराठमोळ्या दागिन्यांच्या प्रेमात पडतात, आज खासदार सुप्रिया सुळेंनाही मोह आवरता आला नाही. त्यांनी पती व मुलासोबत अंबाबाईचे दर्शन घेतले आणि मंदिर आवारातील दुकानात हातभर हिरव्या बांगड्या भरल्या, नाकामध्ये नथ घालून चक्क मंदिरात फोटोसेशनच केले. आरशात आपला मराठमोळा लूक पाहण्यासाठी त्या क्षणभर आसुसल्या._


अंबाबाई दर्शनाला येणारा पर्यटक मंदिराच्या प्रेमात नाही पडला तरच नवल. शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिर आवारात अनेकजण फोटोसेशन करतात. शिवाय मंदिर परिसरातील प्रसादाच्या दुकानात लटकलेल्या मराठमोळ्या दागिन्यांची खरेदीही करतात. कोल्हापूर भेटीला आल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे नेहमीच अंबाबाई दर्शनाला येतात. अनेकदा मंदिराच्या आवारात क्षणभरही न थांबता घाईत निघून जातात. पण आज मात्र त्यांनी मंदिर आवारात जणू क्षणभर विश्रांतीच घेतली.

गतवेळी मंदिराला केलेल्या विद्यूत रोषणाईसोबत सेल्फी घेऊन लगेचच परतलेल्या सुप्रियाताईंनी आज चक्क याठिकाणी थांबून हातभर हिरव्या बांगड्या भरल्या. यानंतर नथ घालून मराठमोळा लूक कॅमेर्यात कैद करण्यासाठी पोझही दिल्या. पती आणि मुलासोबतही अनेक फोटो त्यांनी क्लिक केले.


सौजन्य ;--

माहिती सेवा ग्रुप

पेठवडगाव.            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा