Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १ डिसेंबर, २०२३

देशातील ८० कोटी जनता आयते बसून खातेय--- रेशन बंद करा ;- सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य.

 


*संपादक---- हुसेन मुलाणी*

*! टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

     

आपल्या देशातील ८० कोटी जनता ही ऐतखाऊ असल्याचे धक्कादायक वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केले आहे. या लोकांची रेशन व्यवस्था बंद करून देशाला बलशाली करावे असेही ते म्हणाले आहेत. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खोत बुलढाण्यात आले होते. 

शेतीवर अवलंबून असलेला आता ४० टक्केच समाज उरला आहे. देशात ८० कोटी लोक आयते बसून खात आहेत. यामुळे या लोकांची रेशन व्यवस्था बंद करावी, अशी मागणी खोत यांनी केली आहे. जर एवढी माणसे आयते खात असतील तर हा देश भिकाऱ्यांचा आहे. माणसांना भिकारी बनविण्याचे काम सुरु असे असे खोत म्हणाले आहेत. 


सर्वांना फुकट वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. हे फुकट, ते फुकट असे करता करता भिकाऱ्यांचा देश बनत चालला आहे. प्रत्येकाने कष्ट करावेत, त्यातूनच देश बलशाली होईल असेही खोत म्हणाले. 

महत्वाचे म्हणजे गरीबांना रेशन देण्याची महत्वाकांक्षी योजना मोदी सरकार राबवित आहे. काँग्रेसनेही यापूर्वी या योजना राबविल्या आहेत. परंतू, मोदी सरकारने या धान्यात वाढ केली आहे. य़ा योजनेला मोदी सरकार प्रचाराचा मुद्दा बनवत असताना भाजपाप्रणित युतीत असूनही खोत यांचे असे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. 

 

 सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. टोमॅटो मिळाला नाही म्हणून कोणी मेलं का? असा सवालही खोत यांनी विचारला होता. राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद, शरद पवारांना सैतान म्हणत त्यांना आता गोळ्या घालणार का, असेही खोत म्हणाले होते. 


 सौजन्य;-

माहिती सेवा ग्रुप

  पेठवडगाव.

                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा