Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १२ डिसेंबर, २०२३

अकलुज येथील गिरमे प्लाॕट (जुना सराटी रोड) विविध समस्याच्या विळख्यात.

 



*संपादक---- हुसेन मुलाणी*

*! टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.--9730 867 448*

              विकास नगर शेजारील असलेल्या गिरमे प्लॉटमध्ये विकास कामे न झाल्याने त्या प्लॉटमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे रस्ता , पिण्याचे पाणी गटारीचे सांडापाणी आणि पथदिव्याची सोय करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व अकलूज ग्रामपंचायत च्या माजी सदस्या, उर्वशीराजे मोहिते पाटील ,यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा असंघटित महिला कामगार संघटनेच्या अध्यक्षा व काँग्रेस कमिटीचे प्रदेश संघटक- ज्योतीताई कुंभार यांनी अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

        गिरमे प्लॉटमध्ये पक्के रस्ते नसल्याने तसेच गटारीचे सांडपाणी वाहून जात नसल्याने त्याचा नागरिकांच्या आरोग्या वर परिणाम होत असुन पिण्याचे पाणी पुरेसे उपलब्ध होत नाही शिवाय पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन रात्री अपरात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे या सर्व समस्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्ता, पाणी, सांडपाण्याची गटार व पथदिवे इत्यादी सोय करावी असे निवेदनात म्हटले आहे.

    याप्रसंगी गिरमे प्लाॕट मधील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा