विशेष प्रतिनिधी---राजु(कासिम)मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी.
दिनांक 10 डिसेंबर 2023, वार रविवार रोजी, झालेल्या बैठकीमध्ये तुळजापूर येथील *"श्रीराम"* मंदिरातील मूर्तीचे पुनर्स्थापना करण्यासाठी झालेल्या बैठकी मध्ये एकत्रित आलेल्या सर्व रामभक्तांनी श्रीराम मुर्ती ची पुनर्स्थापनेसाठी दिनांक 22 जानेवारी 2024 या दिवसाची निवड करण्यात आलीअसून त्यासाठी काही समितीची स्थापना केल्या आहेत यामध्ये महिलांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे होता त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन बैठक यशस्वी पार पाडली ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन तरुणांचा सहभाग तसेच गावातील महिलांचा सहभाग हा या "आनंद सोहळ्याला" आणखीनच चांगल्या प्रकारे पार पडतील अशी अशा व्यक्त केली. त्याचबरोबर गावातील इतर कोणी" रामभक्त" या बैठकीत अनुपस्थित होते त्यांनाही या आनंद सोहळ्यात आपली सेवा बजवायची असेल त्यांना सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आवाहन केले आहे कि ज्यांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी सहभागी होऊन या सोहळ्याचे साक्षीदार होऊन या श्रीराम मूर्ती पुनस्थापनेची शोभा वाढवावी असेही आवाहन करण्यात आले
टीप:- यजमान म्हणून इच्छुकांनी आपले नाव नोंदवायचे आहेत. त्यांनी लवकरात लवकर नावे नोंदवून घ्यावेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा