Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

महाबळेश्वर व प्रतापगड येथे लासुर्णे ता. इंदापूर येथील श्री निळकंठेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

 


इंदापूर तालुका--प्रतिनिधी

एस.बी. तांबोळी

टाइम्स 46 न्युज मराठी.

मो.8378 081147

                श्री निळकंठेश्वर विद्यालय, लासुर्णे तालुका इंदापुर मधील सन २००२ च्या इयत्ता १० वी मधील माजी विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या प्रतापगडावर उत्साहात व आगळावेगळा साजरा केला.



              दोन दिवसीय चाललेला हा मेळावा शनिवार दि.२३ डिसेंबर व रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. स्नेह मेळाव्यात जो प्रमुख कार्यक्रम होता तो २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ईश्वर ईन रिसॉर्ट च्या हॉल मध्ये झाला. यावेळी सागर मिसाळ, संदीप लोंढे, तुषार थोरात, सचिन लोंढे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर शितल ठोंबरे, राघु गायकवाड, अनिल पाटील, महावीर लोंढे, उस्मान सय्यद, चंद्रकांत कारंडे, सुधीर भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच दत्तात्रय लोंढे, निलेश घोडके, सुधीर भोसले यांनी पुजन केले.यावेळी धुपपुजा प्रविण लोंढे, अमोल सुर्यवंशी यांच्या हस्ते झाली तर पुष्प पुजा सुरज वनसाळे,‌ सिध्दार्थ लोंढे यांच्या हस्ते झाली.



           यावेळी सर्वच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज वनसाळे यांनी केले. यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून डान्स व फिश पॉइंट ठेवला होता.


    तर दुसऱ्या दिवशी प्रतापगडावर जाऊन श्री निळकंठेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. तेथे महाराजांना मानवंदना दिली. व प्रतापगडावरील छत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन प्रतापगडाच्या इतिहासाच्या पाऊलखुणांचे ऐतिहासिक दर्शन केले.

                     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजन समितीतील सुरज वनसाळे, अमोल सुर्यवंशी, सचिन लोंढे, संदीप लोंढे, सिध्देश्वर राऊत, सिध्दार्थ लोंढे यांनी परिश्रम घेतले. अतिशय उत्साहात दोन दिवसीय आगळेवेगळे ऐतिहासिक स्नेह संमेलन संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा