Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

माळशिरस ते गाणगापूर" श्री दत्त पदयात्रा" पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन.

 


अकलूज -----प्रतिनिधी

केदार लोहकरे

टाइम्स 45 न्युज मराठी.

                 माळशिरस येथील श्री गुरुदेव दत्तसेवा मंडळाच्या वतीने श्री दत्त महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.माळशिरस ते गाणगापूर पायी दिंडी काढण्यात आली असून हे या पालखी सोहळ्याचे पहिलेच वर्ष आहे.

            माळशिरस येथील गुरूवर्य प्रशांतदादा महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गोरे (बारामती), स्वामी भक्त संतोष हंगे (मेडद) यांच्या प्रेरणेतून हि माळशिरस ते गाणगापूर पायीवारीचे आयोजन करण्यात आले आहे.माळशिरसमधून पहिल्यांदाच पायीवारीचे नियोजन करण्यात आले आहे.दि.१३ डिसेंबर ते २३ डिसेंबरला पायीवारीचा प्रवास आहे व दि.२४ तारखेला अष्टतिर्थ व निर्गुण पादुका दर्शन व अभिषेक सोहळा,दि.२५ ला श्री क्षेत्र गाणगापूर येथे दत्त जयंती व सांगता समारंभ व महाप्रसादाचे वाटप दंडवते मठात होणार आहे.

            श्री दत्त महाराज पालखी सोहळ्यातील महाराजांच्या रथाचे काम शेल पिंपळगाव (ता.खेड जि.पुणे) येथील किरण पांडुरंग मोहिते यांनी सुबक व आकर्षक काम केले आहे.



       या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दि.१३ डिसेंबरला माळशिरस येथील पिसेवस्ती श्रीनाथ मंदिर येथून सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी प्रस्थान होणार आहे.रात्रीचा मुक्काम भाईनाथ महाराज मठ वेळापूर,भंडीशेगांव, पंढरपूर,मंगळवेढा,शिरढोण बिरोबा मंदिर,जेऊर रेवणसिध्द मंदिर,इंडी,हिबीतळी प्राथमिक शाळा,देवणगांव प्राथमिक शाळा,आनुर (पदवीपुर्वपौढ शाळा) व गाणगापूर येथे आगमन

        सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावे.तसेच तरूण पिढी भक्ती मार्गात यावे व गोरगरिबांच्या हातून दत्त महाराजांची सेवा घडावी यासाठी पायीवारीचे नियोजन करण्यात आले आहे.प्रशांत महाराज शिंदे यांनी सांगितले.तरी या पादयात्रा दिंडीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर प्रशांत महाराज शिंदे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा.(भ्रमणध्वनी नंबर ७३८७१६७१६७-८४५९८२१००९) संपर्क साधावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा