माळशिरस तालुका--प्रतिनिधी
रशिद शेख
टाइम् 45 न्युज मराठी.
संदेशवहनाची दळणवळणाचे साधने यामध्ये काळाच्या ओघात अनेक स्थित्यंतरे होत गेली टपाल , तार, मनीऑर्डर , या गोष्टी जवळपास नामशेष होवुन जाण्याच्या मार्गावर आहेत . संपर्क माध्यमामध्येही अनेक चमत्कारिकजन्य बदल झालेले आहेत . व्हॉटसअप , ईमेल ,फॅक्स , इंटरनेटच्या जाळ्यामध्ये अवघे समाजमन अडकुन राहिले आहेत .तरीही शहरे अथवा खेडेगाव असो लाल रंगाच्या पत्रपेटीचे विश्वासार्हता कोणीही नाकारु शकत नाही .शासनदरबारी अथवा प्रशासन माध्यमामध्ये तक्रारी विषय असो ही लाल पत्रपेटी सर्वसामान्यांचे अतिव विश्वासाचे संपर्क माध्यम आहे हे कोणीही नाकारु शकत नाही . अगदी देशाच्या पंतप्रधानापासुन ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्या पर्यंत तक्रारी नोंदवण्याचे हे एकमेव माध्यम आहे.तरी परंतु बदलत्या समाजरचनेनुसार ते विचारबंधने व्यक्त करण्यासाठी हे माध्यम काहीसे दुर्लक्षीत झाले आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. मात्र अजुनही सर्वसामान्यांचा शासन यंत्रनेवर विश्वास असल्यामुळे ही लाल पत्रपेटी हे अभिव्यक्ती व्यक्त करण्याचे साधन आहे हे नक्कीच ! प्रशासनाने याही गोष्टींची दखल घेणे आत्यंतिक गरजेची बाब आहे . ही लाल पत्रपेटी अधिक सशक्त समाज माध्यम होणे आवश्यक आहे . या माध्यमाचे अपरिहार्यता नाकारणे सहजासहजी शक्य नाही .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा