Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

घडशी समाजाच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या विधानसभेत केल्याबद्दल घडशी समाजाकडून राम सातपुते आभार.

 


अकलूज-----प्रतिनिधी

शकुर तांबोळी

टाइम्स 46 न्युज मराठी.

               माळशिरस विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते विधान परिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे ,यांना घडशी समाजा बद्दल माहिती देऊन वंचित समाजासाठी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी नागपूर अधिवेशनात आमदार राम सातपुते यांनी केली आणि घडशी समाजाबद्दल प्रश्न उपस्थित केला या अनुषंगाने घडशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील यांनी पाठपुरावा करून तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी ,उपमुख्यमंत्री स्व गोपीनाथ मुंडे ,यांना 1997 रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार बबनराव शिंदे आमदार दिलीप सोपल आमदार राजेंद्र देशमुख आमदार नरसिंग मेगजी, अण्णासाहेब डांगे, गणपतराव देशमुख प्रतापसिंह मोहिते पाटील, यांनी घडशी समाजाबद्दल शासनाने वंचित समाजाला न्याय द्यावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी शिफारस पत्रे करण्यात आलेली होती मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य घडशी समाज बांधवांचा हा प्रश्न आहे हा समाज महाराष्ट्रात अनेक भागात विखुरलेला आहे घडशी समाजासाठी आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे ,घडशी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक मंडळ असावे, घडशी समाजासाठी सभा मंडप असावे, घडशी समाजासाठी देवस्थान जमिनी काही समाजकंटक यांनी हस्तगत केले आहेत त्या परत मिळाव्यात ,समाजातील कलाकारांना मानधन उपलब्ध करण्यात यावे ,घडशी समाजासाठी स्वतंत्र मागासवर्गीय प्रवर्ग देण्यात यावा ,घडशी समाजातील तरुण-तरुणींना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, किंवा शासनाने घडशी समाज अल्पसंख्यांक म्हणून घोषित करण्यात यावा इत्यादी मागण्या संघटनेचे अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील ,अकलूज कार्याध्यक्ष गुलाब जाधव मुंबई, सुनील पवार -फलटण ,हनुमंत भोसले -फलटण ,निलेश वनारे- पंढरपूर, किशोर जाधव -पंढरपूर, माऊली जाधव, पप्पू वनारे ,उद्धव पवार -बारामती, संतोष पवार- पुणे ,अदिक साळुंखे- खरसुंडी, दत्ता पवार- शिंगणापूर, विजय साळुंखे -टेंभुर्णी ,दत्तोबा वाडेकर- शिर्डी, किरण धुमाळ- कोल्हापूर, गोरख मोहिते -तरंगफळ ,साईराम साळुंखे पाटील -उपाध्यक्ष, माळशिरस, तालुका भाजप युवा मोर्चा ओबीसी सेल यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर आमदार राम सातपुते यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला 



त्यामुळे समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वंचित समाजासाठी शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून समाजास न्याय देण्यात यावा अशी समाज प्रतिनिधी कडून आमदार राम सातपुते यांचे अभिनंदन करून शासनास विनंती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा