*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
श्रीपुर येथील ज्येष्ठ पत्रकार 'मनोज गायकवाड' यांना त्यांच्या कडून कॅश फ्रॉड करण्याच्या उद्देशाने फेक कॉल करून फसवण्याचा प्रयत्न केला मात्र मनोज गायकवाड सरांनी वेळीच त्याची फसवेगिरी ओळखून सावधगिरी बाळगली त्याबाबत त्यांनी कथन केलेले अनुभव वाचा आणि तुम्हीही सावध रहा असे त्यांनी केलेले आवाहन
+918269687832 या नंबर वरून एका व्यापाऱ्याला फोन आला.
"मी तुमच्या खात्यात 25 हजार जमा करतो. तुम्ही मला पाच हजार रुपये पाठवा व उरलेले वीस हजार रुपये मी तुमच्याकडून समक्ष घेतो." असे त्या व्यापाऱ्याला सांगितले.
"तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. तुमचा फोटो मला पाठवा." असे त्या व्यापाऱ्याने सांगितले
त्यानंतर समोरील व्यक्तीने माझा (मनोज गायकवाड) फोटो त्या व्यापाऱ्याला पाठविला. त्या व्यापाऱ्याच्या अकाउंटला 25 हजार रुपये पाठविले आहेत. असा टेक्स्ट मेसेज पाठविला. आणि, तातडीने पाच हजार रुपये परत पाठवा. असे सांगितले.
मात्र,
प्रत्यक्षात त्या व्यापाऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा झाले नव्हते. पैसे जमा झाल्याचा बँकेचा मेसेजही पडला नव्हता. केवळ समोरील व्यक्तीने फसवणुकीच्या हेतूने 25 हजार रुपये जमा केल्याचा टेक्स्ट मेसेज पाठविला होता.
हे त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आल्यावर, ज्या नंबरवरून फोन आला होता. त्याला संपर्क केला आणि त्याची उलट तपासणी केली. "मी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलो आहे." असे सांगितले. तेव्हा, त्या व्यक्तीने तातडीने फोन बंद केला.
-
कोणीतरी फसवणुकीच्या हेतूने माझा फोटो पाठवून लोकांना पैसे मागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, मला ओळखत असणाऱ्या आणि माझ्याशी संबंधित असणाऱ्या सर्वांना सावध करण्याच्या हेतूने मी ही घटना कळवित आहे.
माझे नाव सांगून अथवा फोटो पाठवून कोणी पैशाची मागणी करत असेल तर, त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नका.
(ज्या मोबाईल नंबर वरून क्यू आर कोड व माझा फोटो पाठविण्यात आला होता. त्याचा स्क्रीन शॉट माहितीसाठी सोबत पाठविला आहे.)
मनोज गायकवाड .
श्रीपुर ता. माळशिरस जि. सोलापूर.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा