अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 45 , न्युज मराठी.
अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुधा गिरजप्पा बनसोडे यांची महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यपाल नियुक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विद्या परिषदेच्या सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.त्याच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ सुधा बनसोडे यांचे शिक्षण एम.एस्सी,पी.एच.डी, पोस्ट डॉक्टरेट,डि.एस्सी, पोस्ट डॉक्टरेट आणी डि.एस्सी डॉक्टर ऑफ सायन्स डिग्री कॅलिफोर्निया विद्यापीठातून पुर्ण केली आहे. सोलापूर विद्यापीठात पी.एच.डी मार्गदर्शन म्हणून काम पहात आहेत.सध्या पी.एच.डी च्या आठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चालू आहे.त्यांची स्वतःची आठ पुस्तके प्रसिद्ध होऊन ती जगातील सर्व लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. अमेरिका येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात भेट देणा-या पहिल्या प्राध्यापिका आहेत.संशोधन सादर करण्याकरिता यांनी अमेरिकेतील सर्व राज्य,इंग्लंड, श्रीलंका, थायलंड,दुबई,कॅनडा,नेदरलँड्स अशा अनेक पंधरा देशांना प्रमुख व्याख्याती म्हणून भेटी दिल्या आहेत.त्यांना देश विदेशातून उत्कृष्ट शास्त्रज्ञ,उत्कृष्ट विज्ञान प्राध्यापिका,उत्कृष्ट संशोधनकार, उत्कृष्ट शिक्षक,अशी वेगवेगळी पंधरा पुरस्कार मिळालेली आहेत.त्या इंटरनॅशनल जर्नलच्या इडिटरियल बोर्ड मेंबर म्हणून आहेत.तसेच इंटरनॅशनल जर्नलच्या उत्कृष्ट समीक्षक पण आहेत.आतापर्यंत त्यांची इंटरनॅशनल जर्नलमध्ये ७५ पेपर प्रसिद्ध झालेली आहेत.तसेच त्यांची इंटरनॅशनल स्पीकर म्हणून जगभरात ओळख आहे.
डॉ.सुधा बनसोडे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बागडे यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा