Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

"विकसित भारत यात्रेच्या" रथाला या गावात नो एन्ट्री ;---शेतकऱ्यांनी कांदा ओतून केला निषेध निर्यात बंदीचा विचारला जाब...

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी शासनाच्या वतीने विकसित भारत रथाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन स्क्रीनवर विविध विकासकामांची माहिती दिली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी या संकल्प रथापुढे कांदे ओतून सरकारचा निषेध नोंदवत या रथाला माघारी पाठवलंय.

नुकतेच केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात शुल्क लावलं होत त्याचबरोबर मोदी सरकारचे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कामाची माहिती देणाऱ्या या रथाला गावात एंट्री करण्यास विरोध केला आहे. उद्योगपती तुपाशी शेतकरी उपाशी, केंद्र शासनाचं धोरण शेतकऱ्यांचं मरण अशा प्रकारच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या असून या शेतकऱ्यांमध्ये एका भाजपच्या पदाधिकारी असलेल्या शेतकऱ्याने देखील सरकारला घरचा आहेर दिलाय. यावेळी शेतकरी खंडू मोरे, भरत मोरे,डॉ. गोरक्षनाथ मोरे, एकनाथ सूर्यभान फापाळे प्रभाकर मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.



*बात्र्याच्या शेतात १२ अवतं अन् पाहायला गेलं तर एकही नव्हतं*


मोदी सरकार येऊन आज दहा वर्षाचा कालावधी होत असून मोदी सरकारने या बळीराजाला इतका मारणी घातलं की, २१ वेळेस कांद्याच्या भावाला मोदी व बीजेपी सरकार आडवे झालेले आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावून निर्यात बंदी करुन वेळोवेळी असे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर काही करतो असे फक्त दाखवण्याचे कार्य या सरकारचे असून "बात्र्याच्या शेतात १२ अवतं अन् पाहायला गेलो तर एकही नव्हतं" अशी गत या सरकारची असल्याची टीका नाटेगाव येथील शेतकरी एकनाथ फापाळे यांनी केली आहे.


 *सरकारी कर्मचऱ्यांचा वापर कशाला*


शासकीय कोणत्याही कर्मचाऱ्याला तुम्ही मोदींच्या प्रचाराला उतरवू नका कारण ते पगार आमच्या पैशातून घेत आहे. तुम्ही तुमच्या प्रचारासाठी खासगी माणसं नेमा, सरकारी कर्मचाऱ्यांना या कामात अडकवण्याची गरज नाही, शासकीय काम थांबून तुम्ही त्यांना असे काम करण्यास सांगत आहे हे योग्य नसल्याचे शेतकरी प्रभाकर मोरे यांनी म्हटले आहे


*विकसित भारत रथाला भाजप कार्यकर्त्याचा विरोध*


सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सरकार चांगले निर्णय घेत असून शेतकऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे निर्णय चुकीचे आहे असा आमचा सर्व शेतकऱ्यांचा समज आहे, अचानक कांदा निर्यात बंदी करण असे निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीचे वाटतात. मी भाजपचा कार्यकर्ता आहे परंतु आज शेतकऱ्यांनी संकल्प रथाला जे विरोध करत कांदा ओतला, मी यांच्यासोबत असून यांच्या या आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचे भाजप कार्यकर्ते तथा शेतकरी गोरक्षनाथ मोरे यांनी म्हटले आहे.


        *सौजन्य*;--

*li.माहिती.सेवा.ग्रूप.il*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा