अकलूज --- प्रतिनिधी
केदार लोहकरे
टाइम्स 46 न्युज मराठी.
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय अभ्यास केंद्रातील विशाल बाबर या विद्यार्थ्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवामध्ये गोळा फेक या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय क्रीडा महोत्सव स्पर्धेचे नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता,या क्रीडा महोत्सवामध्ये मुंबई,पुणे, अमरावती,नागपूरसह इतर विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता.
अकलूज येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विशाल बाबर या विद्यार्थ्याने गोळा फेक या क्रीडा स्पर्धेत नेत्रदिपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.केंद्रीय क्रीडा महोत्सवामध्ये भाग्यश्री काळे व ऋषिकेश घाडगे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. केंद्रीय क्रीडा महोत्सवामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थ्यांची नागपूर येथे दिनांक १२ ते १६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे (जिल्हा रायगड) येथे २० ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
विशाल बाबर व सहभागी खेळाडूंचे शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील,संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे,प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,केंद्र संयोजक डॉ.बाळासाहेब मुळीक व अभ्यास केंद्रातील सर्व समंत्रक यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा