मंगरुळ---प्रतिनिधी
चाँदसाहेब शेख
टाइम्स 45 न्युज मराठी .
तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा नळ येथील माजी सरपंच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आप्पाराव गुरसिद्ध पाटील यांचे वयाच्या ९७व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवार २७डिसेंबर रोजी राहत्या घरी निधन त्यांच्यावर शासकीय इतमामात बंदुकीच्या गोळ्या झाडून पोलीस सलामी देऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
आप्पाराव पाटील यांनी १९७२ च्या दुष्काळात भूमिहीन , शेतमजूर गोरगरीब , शेतकरी यांना सर्वोतोपरी मदत केल्याचे शोकसभेत उपस्थित परिसरातील मान्यवरांनी व्यक्त केले त्यांनी थेट स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता व देवसिंगा नळच्या बिनविरोध सरपंच पदाचा मानही त्यांना मिळाला होता
शोकसभेस आमदार राणा पाटील , दीपक आलूरे , वसंत वडगावे , राजअहमद पठाण , भीमाशंकर जमादार , राम आलूरे , विजय शिंगाडे , संतोष बोबडे , आनंद कंदले , इब्राहिम शेख यांनी संबोधित केले
माजी सरपंच भगवंत पाटील यांचे वडील तर विध्यमान लोकनियुक्त सरपंच युवराज पाटील यांचे आजोबा होते त्यांच्या पश्चात एक मुलगा , चार मुली सूना नातवंडे असा परिवार आहे ज्येष्ठ व्यक्तीमत्व यांचे निधन झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे यावेळी तलाठी ,मंडळ अधिकारी , पोलीस अधिकारी , कर्मचारी , परिसरातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , क्षेत्रातील मान्यवर व नागरिक हजारो संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा