*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचे अनेकदा प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असं सांगत वंचितने लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला असून समान जागांची मागणी केली आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत यावे, अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे.
शरद पवार म्हणाले की, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क करावं, असं मी खर्गेंना सांगितले आहे. त्यांनी आमच्या सोबत यावं असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत यावे, त्यांना घेऊन आम्ही निवडणुका लढवाव्या, अशी सगळ्यांची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
तर, काँग्रेसची बैठक उद्या होणार आहे. लोकसभेच्या सूत्रांची अद्याप चर्चा झालेली नाही. येत्या १५ दिवसात चर्चा करू. आमची एकत्र बसून निर्णय घेऊ. मागील वेळी अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात होती, अजूनही स्थानिक नेत्यांची मागणी आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच, ईडी, सीबीआय याचा वापर करून या एजन्सीचा फायदा घेऊन राजकारणात फायदा घेणं सुरू आहे. निवडणूक आयोगापुढे आमची सुनवाणी सुरू आहे. आम्ही न्यायची वाट पाहत आहोत, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.
दरम्यान, खासदार निलंबनावरही शरद पवारांनी भाष्य केले. सभागृह सुरू असताना बाहेरचे लोक घुसतात, याची माहिती मागितली म्हणून खासदारांचे निलंबन केले ते योग्य नाही. अशातच, ३ बिल पास केले. भाजप सर्व एजन्सी, यंत्रणेचा वापर राजकारण करण्याकरीता करत आहे. यंत्रणाचे गैरवापर केला जातो, अशी टीका त्यांनी केली. सरकार बदलल्यावर याबाबत दुरुस्तीचा विचार केला जाईल. संसदेत घुसलेल्या लोकांचे काय दुखणे याचा सरकारने विचार करावा, अशा प्रकारे घुसने योग्य नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
*सौजन्य*
*माहिती.सेवा.ग्रूप*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा