Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २७ डिसेंबर, २०२३

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या सन 2024 "दिनदर्शिके "चे प्रकाशन व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न .

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

  *मो.9730 867 448*

                माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीने माळशिरस पंचायत समिती सभागृहात सन 2024 च्या नूतन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 5 हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.




यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी नामदेव टिळेकर होते तर कार्यक्रमासाठी माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील, तहसीलदार सुरेश शेजुळ, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण श्रीमती ए आर ससाने, सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे ,नायब तहसीलदार अमोल कदम ,महावितरण चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संदीप कोकरे,दुय्यम निबंधक डी एस पाटणे,अकलूजचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, माळशिरसचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकाणे,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,वन विभाग अधिकारी शेख साहेब,आरटीओ अधिकारी स्वाती जगताप, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे,माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड जी पी कदम आदी अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा